महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Singer Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांच्या प्रकृतीमध्ये किंचित सुधारणा; मात्र... - गानसम्राज्ञी लता मंगेशकर हेल्थ अपडेट

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत बाबत महत्वाची माहिती ( Lata Mangeshkar Health Update ) समोर आली आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मात्र अद्यापही लता मंगेशकर यांच्यावर आयसीयूमध्येच उपचार सुरू आहेत.

Singer Lata Mangeshkar
गानसम्राज्ञी लता मंगेशकर

By

Published : Jan 22, 2022, 1:06 PM IST

Updated : Jan 22, 2022, 1:57 PM IST

मुंबई - गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना काही दिवसांपुर्वी कोरोनाची लागण ( Lata Mangeshkar Corona Positive ) झाली होती. त्यांच्यावर दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात मागील तेरा दिवसांपासून लता मंगेशकर त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहिती दिली आहे. ते म्हणाले की, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगितले ( Lata Mangeshkar Health Update ) आहे. मात्र अद्यापही लता मंगेशकर यांच्यावर आयसीयूमध्येच उपचार ( Lata Mangeshkar In ICU ) सुरू आहेत.

अफवांवर विश्वास ठेऊ नका -

भारतरत्न लतादीदींच्या आरोग्याबाबत अनेक अफवा पसरत आहेत. मात्र अशा अफवा कुणीही पसरवू नयेत. लता दीदींवर अतिदक्षता विभागात डॉ. प्रतीत समदानी आणि त्यांच्या टीममधील डॉक्टर्स उपचार करत आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी आणि त्यांना रुग्णालयातून लवकर डिस्चार्ज मिळावा, यासाठी सर्वांनी प्रार्थना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा -Neelam Gorhe Visit Dagdusheth Temple : लता मंगेशकरांच्या स्वास्थ्यासाठी श्रीमंत दगडूशेठ चरणी प्रार्थना - डॉ. नीलम गोऱ्हे

Last Updated : Jan 22, 2022, 1:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details