सिंगापूर पोलिसिंगचे महाराष्ट्र पोलिसांना सहकार्य मिळणार, गृहमंत्र्यांच्या भेटीनंतर वाणिज्यदूतांची ग्वाही - सिंगापूर
सायबर क्राईम आणि फॉरेन्सिक सायन्समध्ये सिंगापूर पोलिस वापरत असलेल्या तंत्रज्ञानाची माहिती आणि सहकार्य महाराष्ट्र पोलिसांनाही करुन द्यावे यासंबंधी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि सिंगापूरचे वाणिज्यदूत चेओंग मिंग फूंग यांच्यात चर्चा झाली.
![सिंगापूर पोलिसिंगचे महाराष्ट्र पोलिसांना सहकार्य मिळणार, गृहमंत्र्यांच्या भेटीनंतर वाणिज्यदूतांची ग्वाही Singapore's Consul General Cheong Ming Fung called on Home Minister Dilip Walse](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-13709306-4-13709306-1637631817421.jpg)
गृहमंत्री दिलीप वळसे आणि सिंगापूरचे वाणिज्यदूर चेओंग मिंग फूंग
मुंबई - सिंगापूर गणराज्याचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत चेओंग मिंग फूंग यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची सोमवारी मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्र पोलिसांना पोलिसिंगसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही वाणिज्यदूत चेओंग मिंग फूंग यांनी दिल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.