मुंबई- आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी अनेक भाविक विठ्ठल मंदिरात पंढरपुरात जात असतात. मात्र, सर्वांनाच इच्छा असूनही पंढपूरला जाता येते असे नाही. त्यामुळेच भक्ती कुठूनही करा पण मनापासून करा, असे म्हटले जाते. विठ्ठलाचे दर्शन मिळावे यासाठी 1883 साली मुंबईत सायन येथे विठ्ठलाचे मंदिर म्हणजेच प्रतिपंढरपूर उभारण्यात आले. यंदाचे हे 128 वे वर्ष आहे.
मुंबईतील प्रतिपंढरपूर; सायन येथील विठ्ठल-रखुमाई मंदिराला 128 वर्षांची आहे परंपरा - वारी
या मंदिराचीची एक खासियत आहे. ती म्हणजे सणानुसार विठ्ठल-रखुमाईची वेशभूषा बदलली जाते.
श्री दामोदर खरे महाराज 1860 साली मुंबईत येऊन शिव गावात स्थायिक झाले. एकदा दामोदर खरे पंढरपूरला वारीला गेले होते. तिकडचा सोहळा पाहून ते प्रभावित झाले. पंढरपूरवरून येताना त्यांनी घरी देवपूजेसाठी धातूच्या मूर्ती आणल्या होत्या. पण त्या धातूच्या मूर्ती चोरीला गेल्या. मग पुन्हा मूर्ती चोरीला जाऊ नये म्हणून त्यांनी विठ्ठल-रखुमाईच्या पाषाण मूर्ती त्यावेळी पुन्हा घरी बसवल्या. त्यावेळी शेवगावात कोळी, आगरी, लोक राहत होते. या लोकांनी मूर्ती मंदिरात स्थापन करावी अशी दामोदर पंतांकडे इच्छा व्यक्त केली. त्यानुसार खरे यांनी मूर्तीची स्थापना केली व मंदिर बांधले. एवढेच नव्हे तर पंढरपूर इथल्या रखुमाई मंदिरात पूजा करणार्या पंढरीनाथ उत्पात यांना मुंबईत आणले. पूजेसाठी सर्व जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. मंदिराचा कारभार पाहण्यासाठी ट्रस्ट नेमण्यात आले. त्याची जबाबदारी वासुदेव सोमण व उत्पात कुटुंबांकडे सोपवण्यात आली आहे, ती आजपर्यंत आहे.
या मंदिराचीची एक खासियत आहे. ती म्हणजे सणानुसार विठ्ठल-रखुमाईची वेशभूषा बदलली जाते. वसंत ऋतूमध्ये मूर्तीला चंदनाचा लेप लावून कृष्ण नरसिंह अशी अनेक रूपे दिली जातात. दिवाळी नवरात्र अशा सणासुदीला मूर्तीला अलंकारांनी सजवले जाते. आषाढी एकादशीच्या दिवशी मंदिराची सजावट केली जाते. दर्शनासाठी भाविक प्रचंड प्रमाणात या ठिकाणी गर्दी करतात.