महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 9, 2021, 11:23 AM IST

Updated : Mar 9, 2021, 12:04 PM IST

ETV Bharat / city

मुंबईत अंशतः लॉकडाऊनचे संकेत, हॉटस्पॉटमधील सोसायट्यांना नोटिसा

कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता मुंबईत अंशतः लॉकडाऊन लावण्याचे संकेत पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले आहेत. मुंबईत अजून रुग्णसंख्या वाढली तर अंशतः लॉकडाऊन लावला जाऊ शकतो असे शेख यांनी म्हटले आहे.

मुंबईत अंशतः लॉकडाऊनचे पालकमंत्र्यांचे संकेत
मुंबईत अंशतः लॉकडाऊनचे पालकमंत्र्यांचे संकेत

मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता मुंबईत अंशतः लॉकडाऊन लावण्याचे संकेत पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले आहेत. मुंबईत अजून रुग्णसंख्या वाढली तर अंशतः लॉकडाऊन लावला जाऊ शकतो असे शेख यांनी म्हटले आहे.
ज्या शहरांमध्ये, जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, तेथील जिल्हाधिकाऱ्यांना परिस्थितीनुसार निर्णय घेण्यास सांगितले आहे. मुंबईत काही नाईट क्लब अजूनही सुरू आहेत. ट्रेन, बस, लग्न-समारंभ, गर्दीची ठिकाणे, पर्यटन स्थळ या सर्व बाबींचा विचार करण्यात येत आहे. जर मुंबईत संख्या अजून वाढत गेली तर अंशतः टाळेबंदी केली जाऊ शकते असे त्यांनी म्हटले आहे.

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे

कोरोना रुग्णांची आकडेवारी -
मुंबईत सोमवारी 1008 रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 34 हजार 572 वर पोहचला आहे. आज 4 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 504 वर पोहचला आहे. 956 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 3 लाख 11 हजार 407 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 10 हजार 779 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 225 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 20 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. 193 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 34 लाख 34 हजार 610 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

हे विभाग हॉटस्पॉट -
मुंबईत बोरिवली, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर, टिळक नगर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. या विभागात कोरोनाचे नियम पाळावेत म्हणून सोसायट्यांना पालिकेने नोटीस बजावल्या आहेत.

रुग्णसंख्या वाढली -
मुंबईत 6 जानेवारीला 795, 7 जानेवारीला 665, 8 जानेवारीला 654, 10 जानेवारीला 656 कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर रोज 300 ते 500 दरम्यान रुग्ण आढळून येत होते. 14 फेब्रुवारीला 645, 15 फेब्रुवारीला 493, 16 फेब्रुवारीला 461, 17 फेब्रुवारीला 721, 18 फेब्रुवारीला 736, 19 फेब्रुवारीला 823, 20 फेब्रुवारीला 897, 21 फेब्रुवारीला 921, 22 फेब्रुवारीला 760, 23 फेब्रुवारीला 643, 24 फेब्रुवारीला 1167, 25 फेब्रुवारीला 1145, 26 फेब्रुवारीला 1034, 27 फेब्रुवारीला 987, 28 फेब्रुवारीला 1051, 1 मार्चला 855, 2 मार्चला 849, 3 मार्चला 1121, 4 मार्चला 1103, 5 मार्चला 1173, 6 मार्च 1188, 7 मार्चला 1360, 8 मार्चला 1008 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

या दिवशी कमी रुग्णांची नोंद -
मुंबईत मार्च पासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. मुंबईत 7 नोव्हेंबरला 576, 10 नोव्हेंबरला 535, 16 नोव्हेंबरला 409, 18 जानेवारीला 395, 24 जानेवारीला 348, 26 जानेवारीला 342, 1 फेब्रुवारीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.

Last Updated : Mar 9, 2021, 12:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details