मुंबई - अभिनेत्री श्वेता तिवारी हिचा दुसरा पती अभिनव कोहली (38) याला समता नगर पोलिसांनी अटक केली आहे. स्वतः श्वेता तिवारी व तिच्या मुलीने दिलेल्या तक्रारीवरून समता नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.
अभिनेत्री श्वेता तिवारीच्या दुसऱ्या पतीला अटक - FIR
अभिनेत्री श्वेता तिवारी हिचा दुसरा पती अभिनव कोहली याला समता नगर पोलिसांनी अटक केली आहे. श्वेता तिवारी हिच्या मुलीला अभिनव कोहली त्याच्या जवळील मोबाईल फोन मधील मॉडेलचे फोटो दाखवीत होता. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
श्वेता तिवारी हिच्या मुलीला 2017 पासून अभिनव कोहली हा अश्लील शिवीगाळ करीत, त्याच्या जवळील मोबाईल फोन मधील मॉडेलचे फोटो दाखवीत होता. या प्रकरणी श्वेता तिवारी हिच्याकडे तिच्या मुलीने तक्रार केल्यानंतर सुरवातीला श्वेता तिवारी हिने तिच्या पतीला समजविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हा प्रकार न थांबल्याने शेवटी श्वेता तिवारी हिने समता नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
पोलिसांनी या प्रकरणी कलम 354-A, 323, 504, 506, 509 IPC r/w 67-A आयटी नुसार गुन्हा नोंदवून आरोपी अभिनव कोहली यास अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.