सुशांतसिंह आत्महत्या : अमली पदार्थ प्रकरणी करन सजनानी ब्रिटीश मिलेनिअरला अटक - सुशांतसिंह राजपूत प्रकरण
करन सजनानी याला अंमली पदार्थांची भारतात तस्करी केल्या प्रकरणी मुंबई एनसीबीने अटक केली आहे. तर याच प्रकरणात अभिनेत्री दिया मिर्जाची माजी मॅनेजर राहिला फर्निचरवाला हिला एनसीबीने अटक केली आहे.
मुंबई - करन सजनानी याला अंमली पदार्थांची भारतात तस्करी केल्या प्रकरणी मुंबई एनसीबीने अटक केली आहे. तर याच प्रकरणात अभिनेत्री दिया मिर्जाची माजी मॅनेजर राहिला फर्निचरवाला हिला एनसीबीने अटक केली आहे. एनसीबीचे अधिकारी समिर वानखेडे यांनी कारवाई केली.
अभिनेता सुशांत सिंह अंमली पदार्थ प्रकरणातील तस्कर अनुज केशवानीला एनसीबीने अटक केली होती. अनूज केशवानी करन सजनानी कडूनच अंमली पदार्थ घेऊन तस्करी करत होता. इतकेच नाही तर परदेशातील महागडे अंमली पदार्थांची तस्करीही करन सजनानी करायचा. करन सजनानी हा प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक असून तो ब्रिटिश नागरिक आहे. एनसीबीने त्याच्याकडून ७५ किलो भारतीय गांजा, तर १२५ किलो परदेशी अंमली पदार्थ जप्त केले आहेत. करन सजनानी आर्टिशनल मॅरुआना ज्वाईंट अमेरिकेचे इम्पोर्टेंड बड रिकामे बाॅक्स सांगून एअरपोर्टवरुन घेवून आला होता. ज्याचे वजन १.१ किलो आहे आणि त्याची बाजारातील किंमत ६० ते ७० लाख रुपये आहे. करन सजनानी हा परदेशी अंमली पदार्थ भारतातील गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि मेघालय या राज्यात तस्करी करायचा.
एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांची धडक कारवाई -
अमली पदार्थ तस्करी प्रकरणी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी अभिनेत्री दिया मिर्जाची माजी मॅनेजर राहिला फर्निचरवाला आणि तिझी बहिण सहिष्ठा फर्निचरवाला या दोघींनाही अटक केली. राहिला ही करन सजनानीला भारतात तस्करी करायला आर्थिक साह्या सोबतच तस्करी करायला मॅन पावर आणि गाड्या पुरवायची..