महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Shubhash Desai Challenged Fadnavis : हिंमत असेल तर नागपूर महापालिकेची चौकशी करा, सुभाष देसाई यांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा - Shubhash Desai Challenged Fadnavis

Shubhash Desai Challenged Fadnavis : मुंबई महापालिकेच्या Mumbai Municipal Corporation कामांवर आक्षेप घेणाऱ्या भाजपला शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी दसरा मेळाव्यात चांगलेच धारेवर धरले. हिंमत असेल तर नागपूर महापालिकेची Nagpur Municipal Corporation चौकशी करा असा निशाणा देसाई यांनी देवेंद्र फडवणवीसांवर साधला आहे.

Shubhash Desai attacks on Fadanvis
सुभाष देसाई यांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

By

Published : Oct 6, 2022, 5:19 PM IST

मुंबई -Shubhash Desai attacks on Fadanvis : मुंबई महापालिकेच्या कामांवर आक्षेप घेणाऱ्या भाजपला शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी दसरा मेळाव्यात चांगलेच धारेवर धरले. तसेच हिंमत असेल भाजपची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेतील गैरव्यवहाराची चौकशी करा, असे थेट आव्हान दिले. दरम्यान, मुंबई महापालिकेची चौकशी करून खोदा पहाड़, निकला चूहा अशी परिस्थिती निर्माण होईल, हाती काही लागणार नाही, असे म्हणत सुभाष देसाई यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. ( Shubhash Desai attacks on Fadanvis )


मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप आक्रमक झाला आहे. दिवसागणिक मुंबई मनपातील कारभारावर ठपका ठेवत आहे. खासकरून देवेंद्र फडणवीस देखील नागपूरवरून मुंबईत महापालिकेतील शिवसेनेच्या काराभाराची चौकशी करू अशी धमकी देत आहेत. देसाई यांनी यावरून देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करताना, नागपुरातील कारभारावर टीका केली. नागपुरकरांना २४ तास पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत भाजपशी संबंधित एका ओसीडब्लयू कंपनीला ठेका दिला होता. परंतु, काही ठिकाणे वगळता नागरिकांना पाणी मिळालेले नाही. आता ही ओसीडब्लयू कंपनी महापालिकेकडे ८० कोटी रुपये मागते आहे. त्यासाठी काम अडवून ठेवले आहे. महापालिकेने कंपनीला ७० कोटी पैसे द्यावे म्हणून भाजपचे नेते दबाव आणत आहेत, असा आरोप देसाई यांनी केला.



फडणवीसांनी आधी नागपुरची चौकशी करावी -नागपुरमध्ये आपली बस योजनेत या योजनेत खासगी ठेकेदरांना बस चालवण्यास दिल्या होत्या. सुरुवातील या ठेकेंदारांना जे उत्पन्न येईल. त्यात काम करण्याची मुभा होती. आज त्यासाठी १०० कोटी रुपये देण्याचा घाट घातला गेला आहे, याची चौकशी झाली पाहिजे. १०० कोटी रुपये नागपुरच्या महापालिकेचे, नागरिकांचे कसे दिले जातात, याची चौकशी करणार का ? असा सवाल त्यांनी फडवणीसांना केला आहे. उद्धव ठाकरे आणि अदित्य ठाकरेंनी मुंबईत विकास ( Uddav and Aditya develop Mumbai ) केला आहे. बदलेली सुंदर मुंबई ही त्यांना बघवत नाही, म्हणून मी फडणवीसांना मी सांगू इच्छितो की त्यांनी आधी नागपुरची चौकशी ( Fadnavis to investigate Nagpur first ) करावी, असे आव्हान दिले. तसेच, कितीही चौकशी करा काहीही हाती लागणार नाही.


मुंबईचे लचके तोडून खिळखिळे करण्याचा प्रयत्न - मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव भाजपाकडून केला जात आहे. हा भाजपचा मनसुबा महाराष्ट्र आणि मुंबईसाठी धोकादायक आहे. आर्थिक ताकद ही मुंबईत आहे. मुंबई आणि महाराष्ट्राचे लचके तोडून खिळखिळे करण्याचा प्रयत्न आहे. हातातोडांशी आलेला घास गुजरातला गेला. त्यामुळे शिवसेनेचा भगवा मुंबई पालिकेवर फडकवायलाच हवा. तरच ही मुंबई महाराष्ट्रात ठेवता येईल. मुंबई महाराष्ट्रात हवी असे वाटणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाने उद्धव ठाकरेंसोबत राहायला हवे, असे आवाहन त्यांनी केले.


जमलेले मावळे, उडालेले कावळे -एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे ( Eknath Shinde Rebellion ) शिवसेनेत फूट पडली असून प्रथमच दोन ठिकाणी दसरा मेळावा झाला. सुभाष देसाई यांनी यावरून शिंदे गटावर जोरदार प्रहार केला. शिवतिर्थावर जमलेले ते मावळे आणि उडालेले ते कावळे, भारतीय जनता पक्षाने काकवळ ठेवलीय तोपर्यंत कावळे आहेत. जेव्हा भाजप शित टाकणे बंद करेल तेव्हा कावळे कावकाव करत उडून जातील, असे म्हणत सुभाष देसाई यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला.

ABOUT THE AUTHOR

...view details