महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मोदी सरकारने सात वर्षांत इंधनामधून कमावले १३.५ लाख कोटी रुपये - श्रीरंग बरगे

पेट्रोल व डिझेलमुळे नागरिकांना महागाईला तोंड द्यावे लागत आहे. या मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने मोदी सरकारवर टीका केली आहे. मोदी सरकारने करवाढीतून सात वर्षांमध्ये 13.5 लाख कोटी रुपये कमविल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव श्रीरंग बरगे यांनी केला आहे.

श्रीरंग बरगे
श्रीरंग बरगे

By

Published : Sep 29, 2021, 4:40 PM IST

Updated : Sep 29, 2021, 4:48 PM IST

मुंबई - पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसमध्ये प्रचंड दरवाढ करून केंद्रातील मोदी सरकारने जनतेचे जगणे मुश्कील केले आहे. पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली आहे. एक रुपया इंधन दरवाढ झाली की, त्यावेळी रस्त्यावर उतरून आंदोलने करणारे भाजपाचे नेते कार्यकर्ते कुठे गेले आहेत? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव श्रीरंग बरगे यांनी विचारला आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव श्रीरंग बरगे म्हणाले, की आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर निचांकी पातळीवर असताना केंद्र सरकार इंधनावर भरमसाठ करवाढ करत लुट करत आहे. त्यात आणखी १८ रुपये रस्ते विकास उपकराच्या (CESS) माध्यमातून घेतले जात आहेत. तर ४ रुपये कृषी उपकराच्या माध्यमातून घेतले जात आहेत. करांशिवाय आज पेट्रोलची किंमत ३२ रुपये ७२ पैसे प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत ३३ रुपये ४६ पैसे प्रति लिटर आहे.

हेही वाचा-नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजारांची मदत द्या - चंद्रशेखर बावनकुळे

मोदी सरकारकडून इंधनावरील करात भरमसाठ वाढ-

मोदी सरकारने डिझेलवर ८०० टक्केहून अधिक तर पेट्रोलवर २५० टक्केहून अधिक उत्पादन शुल्क (Excise Duty) लावून पेट्रोलचे दर १०७. २६ रुपये प्रति लिटरवर वाढविले आहेत. तर डिझेलचे दर ९६. ४१ रुपये प्रति लिटरपर्यंत वाढवले आहेत.

हेही वाचा-Maharashtra Rain : मराठवाड्यातील शेतकऱ्यांनो धीर सोडू नका.. सरकार तुमच्या पाठिशी, आपत्तीतून बाहेर काढू - मुख्यमंत्री

मोदी सरकारने १३.५ लाख कोटी रुपये कमावले -

पुढे श्रीरंग बरगे म्हणाले, की आज पुन्हा एलपीजी गॅस सिलींडरच्या दरात २५ रुपयांची वाढ केल्याने गॅस सिलिंडरचा दर ८५९ रुपये झाला आहे. जनतेमध्ये या महागाईविरोधात प्रचंड असंतोष आहे. मोदी सरकारने निर्लज्जपणाच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत. मोदी सरकारने ७ वर्षात चक्क १३.५ लाख कोटी रुपये कमावले असल्याचा आरोपही बरगे यांनी केला आहे. केंद्र सरकारने ही दरवाढ तात्काळ मागे घेऊन सामान्यांना दिलासा दिला पाहिजे, अशी मागणीही काँग्रेस कमिटीचे सचिव बरगे यांनी केली.

हेही वाचा-... तर राज्यकर्त्यांची दिवाळी कडवट करू; राजू शेट्टी आक्रमक

Last Updated : Sep 29, 2021, 4:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details