महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यात रेमडेसिवीरची टंचाई : केंद्राकडून दिवसाला केवळ 28 हजार इंजेक्शनचा पुरवठा - Corona updates in Maharashtra

राज्यात मागील महिन्याभरापासून या इंजेक्शनचा मोठा तुटवडा आहे. सद्या राज्याला अंदाजे 65 हजार इंजेक्शनची गरज असताना दिवसाला 30 हजार इतकेच इंजेक्शन उपलब्ध होत आहेत. केंद्र सरकारकडून 21 ते 30 एप्रिल या दिवसाच्या कालावधीसाठी 4 लाख इंजेक्शन पुरवण्याचे आदेश आहेत. त्यानुसार दिवसाला 28 ते 30 हजार इंजेक्शन उपलब्ध होत असून अंदाजे 35 हजार इंजेक्शनचा तुटवडा असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) विभागाने दिली आहे.

remedesivir injection
remedesivir injection

By

Published : Apr 30, 2021, 4:04 PM IST

मुंबई- गंभीर कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन वापरले जात आहे. राज्यात मागील महिन्याभरापासून या इंजेक्शनचा मोठा तुटवडा आहे. सद्या राज्याला अंदाजे 65 हजार इंजेक्शनची गरज असताना दिवसाला 30 हजार इतकेच इंजेक्शन उपलब्ध होत आहेत. केंद्र सरकारकडून 21 ते 30 एप्रिल या दिवसाच्या कालावधीसाठी 4 लाख इंजेक्शन पुरवण्याचे आदेश आहेत. त्यानुसार दिवसाला 28 ते 30 हजार इंजेक्शन उपलब्ध होत असून अंदाजे 35 हजार इंजेक्शनचा तुटवडा असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) विभागाने दिली आहे. त्यामुळे रुग्णांचे आणि नातेवाईकांचे हाल सुरूच आहेत.

टंचाईत काळाबाजार

दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. अनेक रुग्ण गंभीर होत आहेत. अशावेळी रुग्णांना वाचवण्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर वाढत आहेत. गरज असेल तरच इंजेक्शन वापरा, रेमडेसिवीरने रुग्णांचा जीव वाचत नाही, असे जगभरातील तज्ज्ञ सांगत असले तरी या इंजेक्शनची मागणी वाढत आहे. सध्या राज्यात अंदाजे 7 लाख रुग्ण सक्रिय असून यातील किमान 65 हजार रुग्णांना इंजेक्शन लागत आहे. एका रुग्णाला 6 इंजेक्शनचा डोस दिला जातो. देशात रुग्णसंख्या वाढत असल्याने इंजेक्शनची मागणी वाढत आहे. इंजेक्शनच्या वितरणाचे सर्व अधिकार केंद्र सरकारकडे आहेत. केंद्र सरकारकडून मागणीच्या 50 टक्केही इंजेक्शन मिळत नसल्याने राज्यात इंजेक्शनचा प्रश्न गंभीर आहे. तर दुसरीकडे या परिस्थितीचा फायदा घेत औषधांचा काळाबाजार सुरु आहे. इंजेक्शन विकत घेत ते दुप्पट ते तिप्पट दरात विकले जात आहेत. तर नकली इंजेक्शनची देखील चढ्या दरात विक्री सुरु आहे.

केंद्राकडून पुरेसा पुरवठा नाही…

रेमडेसिवीर इंजेक्शनचे वितरण केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. त्यानुसार 21 ते 30 एप्रिल या 10 दिवसांसाठी राज्याला 4 लाख 35 हजार इंजेक्शन देण्यात येत आहेत. या साठ्यांपैकी 2 लाख 97 हजार रुपयांचा 24 इंजेक्शनचा साठा 21 ते 28 एप्रिलपर्यंत राज्याला उपलब्ध झाला आहे. तर आता लवकरच 1 लाख 37 हजार इंजेक्शन मिळतील, अशी माहिती एफडीएने दिली आहे. केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या साठ्याचा विचार करता दिवसाला साधारणपणे 40 हजार इंजेक्शन उपलब्ध होऊ शकतात. पण प्रत्यक्षात संपूर्ण साठा एकत्र मिळत नसून टप्या-टप्याने इंजेक्शन मिळत आहेत. राज्याला दिवसाला 28 ते 30 हजार इंजेक्शन वितरणासाठी उपलब्ध होत असल्याचे एफडीएकडून सांगण्यात येत आहे. 28 एप्रिलला 28 हजार 945 तर 29 एप्रिलला 30 हजार इंजेक्शनचे वितरण राज्यातील विविध रुग्णालयात करण्यात आले. यात ऊर्वरित 1 लाख 37 हजार इंजेक्शन कधी उपलब्ध होतात, याकडे एफडीएचे लक्ष लागले आहे. दरम्यान राज्यातील कोरोनाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता अधिक इंजेक्शन द्यावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details