महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत आरोग्य कर्मचाऱ्यांची लसीकरणाकडे पाठ

मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू आहे. सर्वानी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करूनही आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर यांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे. ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी आणि फ्रंटलाईन वर्कर यांनी लसीचा दुसरा डोस घेतला नाही त्यांचा शोध घेऊन २१ जूनपूर्वी लसीचा डोस दिला जाईल, अशी माहिती मुंबईच्या महपौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

मुंबईत आरोग्य कर्मचाऱ्यांची लसीकरणाकडे पाठ
मुंबईत आरोग्य कर्मचाऱ्यांची लसीकरणाकडे पाठ

By

Published : Jun 14, 2021, 9:57 PM IST

मुंबई -मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू आहे. सर्वानी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करूनही आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर यांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे. ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी आणि फ्रंटलाईन वर्कर यांनी लसीचा दुसरा डोस घेतला नाही त्यांचा शोध घेऊन २१ जूनपूर्वी लसीचा डोस दिला जाईल, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. तसेच केंद्राकडून महापालिकेला कमी प्रमाणात लसी मिळत असल्याचा आरोपही यावेळी महापौरांनी केला आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांची लसीकरणाकडे पाठ

फेब्रुवारीपासून मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आली आहे. ही लाट ओसरत असली तरी लसीचा पुरवठा योग्य प्रमाणात होत नसल्याने लसीकरण ठप्प होत आहे. त्यातच आता लसीकरणाकडे आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर यांनी पाठ फिरवल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत्त एकूण 3 लाख 08 हजार 694 आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. यातील 1 लाख 87 हजार 689 आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला तर 1 लाख 21 हजर 5 कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. अद्यापही 66 हजार 684 आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही. तर दुसरीकडे आतापर्यंत 3 लाख 64 हजार 736 फ्रंटलाईन वर्करचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यातील 2 लाख 35 हजार 288 वर्करनी पहिला तर 1 लाख 29 हजार 448 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. अजूनही 1 लाख 05 हजार 840 फ्रंटलाईन वर्कर्सनी लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही.

मुंबईत आरोग्य कर्मचाऱ्यांची लसीकरणाकडे पाठ

..तर 24 तास लसीकरण सुरू करणार - महापौर

२१ जूनपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्यासाठी पालिकेची सर्व लसीकरण केंद्र सज्ज आहेत. मुंबईत सध्या सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत लसीकरण केले जाते. केंद्राने जास्त प्रमाणात लसीचा पुरवठा केल्यास रात्री ९ वाजेपर्यंत लसीकरण सुरू ठेवले जाईल. गरज पडल्यास तीन पाळ्यांमध्ये २४ तास लसीकरण केले जाईल अशी माहिती महापौरांनी यावेळी दिली. केंद्राकडून लस मुबलक प्रमाणात मिळत नाही, जेवढी लस मिळत आहे ती नागरिकांना दिली जात आहे. असे सांगत पालिकेला लसीचा पुरवठा होत नाही, मात्र खासगी रुग्णालयात लस उपलब्ध होते असा आरोपही यावेळी महापौरांनी केला आहे.

हेही वाचा -परमबीर सिंह यांना २२ जूनपर्यंत अटक करता येणार नाही

ABOUT THE AUTHOR

...view details