मुंबई - चित्रीकरणाला सांस्कृतिक विभागाने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा लाईट, कॅमेरा, अॅक्शन या शब्दांसाठी गोरेगावची दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणजे फिल्म सिटी सज्ज झाली आहे.
ईटीव्ही भारत विशेष: 'लाईट, कॅमेरा, अॅक्शन'साठी गोरेगाव चित्रनगरी सज्ज; सेट उभारणीला सुरुवात - दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव बातमी
लॉकडाऊनमुळे गेले दोन महिन्यांहून अधिक काळ चित्रनगरीतही चित्रीकरण बंद होते. नुकतेच 15 जूनपासून चित्रनगरीमध्ये मालिका, चित्रपट व डिजीटल मालिकांच्या चित्रीकरणाला शासनाने सांगितलेल्या नियमावलीनुसार परवानगी देण्यात आली आहे.

लॉकडाऊनमुळे गेले दोन महिन्यांहून अधिक काळ चित्रनगरीतही चित्रीकरण बंद होते. नुकतेच 15 जूनपासून चित्रनगरीमध्ये मालिका, चित्रपट व डिजीटल मालिकांच्या चित्रीकरणाला शासनाने सांगितलेल्या नियमावलीनुसार परवानगी देण्यात आली आहे. आतापर्यंत 15 ते 20 प्रोडक्शन हाऊसने परवानगीसाठी अर्ज केला असून, त्यांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच चित्रनगरी बाहेरही चित्रीकरणास परवानगी देण्यास आजपासून सुरू करण्यात आल्याची माहिती दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापक ( कलागरे) संगीता शेळके यांनी दिली.
चित्रनगरीत सुमारे 20 ते 25 सेट असून विविध चॅनेलवरील मालिका व चित्रपट यांचे चित्रीकरण केले जाते. चित्रनगरीत प्रवेश करताना सर्वांचे थर्मल स्क्रीनिंग व सॅनिटायझेशन करून प्रवेश दिला जातो. शासनाने सांगितलेल्या सर्व नियमावलीचे पालन करण्याची जबाबदारी संबंधितांची आहे. चित्रीकरणाची परवानगी मिळाल्यावर संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या आगामी चित्रपटासाठी सेट उभारण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. चित्रपटाच्या सेटवर काही अनुचित प्रकार घडल्यास रुग्णवाहिकेची सोयदेखील करण्यात आली आहे. आता परवानगी मिळाली आहे. अजूनही सेटवर काम करणारे बहुतांश कामगार आपल्या गावाकडे आहेत. त्यांना फोन करून परत बोलवले आहे. ते आल्यावर व सरकारने सांगितलेल्या सर्व नियमावली उभारून प्रत्यक्षात चित्रीकरण सुरू व्हायला 2 ते 3 आठवडे अजून जातील, असे एका मालिकेच्या परवानगी घेण्यास आलेल्या निर्मात्याने सांगितले.