नांदेड - जिल्ह्यातील अर्धापूर शहरात राहणारे माजी सैनिक नारायणराव लक्ष्मण साबळे यांना स्वतःच्या मुलानेच दगडाने जबर मारहाण करून खून केल्याची घटना दि.६ शनिवारी रोजी दुपारी घडली आहे. या खून प्रकरणी शनिवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मुलास पोलिसांनी अटक केली आहे.
पित्याचा उपचारादरम्यान मृत्यू -
अर्धापूर शहरातील लहुजी नगरातील सेवानिवृत्त सैनिक नारायणराव लक्ष्मण साबळे घरी असतांना मुलगा विजय नारायणराव साबळे यांनी घरगुती कारणांमुळे वाद घालून वडील नारायणराव लक्ष्मण साबळे यांना लाथा-बुक्या व दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. सरकारी रूग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी मृत घोषित केले.