महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गरबा खेळणे पडले महागात; विरारमध्ये पिता-पुत्राचा मृत्यू - Shocking death of father and son

विरारमध्ये गरब्याच्या नादात पिता-पुत्राचा दुर्दैवी मृत्यू ( Unfortunate death father and son ) झाला आहे. गरबा खेळताना पुत्राला हृदयविकाराचा झटका ( Son suffered heart attack while playing Garba ) आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे पाहून वडिलांनाही हृदयविकाराचा झटका ( Father also heart attack ) येऊन त्यांचा त्यात मृत्यू झाला. विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी परिसरातील ही धक्कादायक घटना घडली.

Unfortunate death father and son
पिता पुत्राचा दुर्दैवी मृत्यू

By

Published : Oct 3, 2022, 2:58 PM IST

Updated : Oct 3, 2022, 5:42 PM IST

विरार - विरारमध्ये गरबा खेळणे पिता-पुत्राच्या जीवावर चांगलेच बेतले ( Unfortunate death father and son ) आहे. विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी ( Global City of Virar West ) येथे राहणारा मनीष नरपत जैन हा रात्रीच्या सुमारास बिल्डिंगच्या आवरात गरबा खेळत होता. यावेळी त्याला अचानक हृदयविकाराचा झटका ( Son suffered heart attack while playing Garba ) आला. यावेळी त्याच्या वडिलांनी, तिथे असलेल्या नागरिकांनी त्याला विरारच्या संजीवनी रुग्णालयात नेले. मात्र, उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला.मुलाचा मृत्यू झाल्याचे पाहून त्याचचे वडील नरपत जैन यांनाही हृदयविकाराचा झटका ( Father also heart attack ) आल्याने ते कोसळले. या घटनेत त्यांचाही जागीच मृत्यू झाला. एकाच दिवशी घरातील दोन सदस्यांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

विरारमध्ये पिता-पुत्राचा मृत्यू

पालघर जिल्ह्यातील विरार शहरात गरबा कार्यक्रमात नाचताना एका 35 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली. विरार पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, शनिवार-रविवारच्या मध्यरात्री विरारमधील ग्लोबल सिटी कॉम्प्लेक्समध्ये गरबा कार्यक्रमात मनीष नरपत जैन नाचत असताना खाली पडला. त्याला विरारच्या संजीवनी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याला तपासून मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, मुलाचा मृत्यू झाल्याचे पाहून त्यांचे वडीलही खाली कोसळले. त्यांचा ही या घटनेत जागीच मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून या संदर्भात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

Last Updated : Oct 3, 2022, 5:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details