महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

भाजप सत्तेत येण्यास राष्ट्रवादीचा चोंबडेपणा कारणीभूत; 'सामना'तून शरद पवारांवर खरमरीत टीका - shivsena on NCP

राष्ट्रवादीने 2014 मध्ये भाजप सरकारला पाठिंबा द्यायचा चोंबडेपणा केला नसता, तर आज राज्याचे चित्र वेगळे असते, असे शिवसेनेच्या 'सामना' या मुखपत्रातून पवार यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले आहे.

भाजप सत्तेत येण्यास राष्ट्रवादीचा्या मुखपत्रातून सांगण्यात आले चोंबडेपणा कारणीभूत असल्याचे शिवसेनेच्

By

Published : Oct 12, 2019, 1:01 PM IST

Updated : Oct 12, 2019, 1:46 PM IST

मुंबई - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नुकतेच प्रचारादरम्यान, युती सरकारच्या काळात महाराष्ट्र अधोगतीला चालल्याची टीका केली. तसेच आघाडी सरकारच्या काळात राज्य शासनावरील कर्जाचा डोंगर आता दुप्पट झाल्याचेही ते म्हणाले होते. यावर आज शिवसेनेच्या 'सामना' या मुखपत्रातून पवार यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. ही सर्व परिस्थिती उद्भवण्यासाठी शरद पवार हेच कारणीभूत असल्याचे शिवसेनच्या मुखपत्रातून सांगण्यात आले आहे.

राज्य अधोगतीला चालले आहे; आणि त्यासाठी भाजप शासन जबाबदार आहे, असे पवार यांना वाटत असल्यास 2014च्या फडणवीस सरकारची पहिली विट रचणारे पवारच होते, हे त्यांनी विसरू नये; अशी खरमरीत टीका करण्यात आली आहे. तसेच याबद्दलची कबुली अजित पवार हेच देत असल्याचे मुखपत्रातून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा शिवसेनेचा वचननामा शनिवारी होणार जाहीर

राष्ट्रवादीने 2014 मध्ये भाजप सरकारला पाठिंबा द्यायचा चोंबडेपणा केला नसता, तर आज राज्याचे चित्र वेगळे असते, असे 'सामना' मधून सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्री दिल्लीच्या आदेशाने राज्य चालवत असल्याची टीका शरद पवार यांनी केली होती. याला प्रत्युत्तर देताना, 2014 मध्ये राष्ट्रवादीचा चोंबडेपणाच कारणीभूत असल्याची टीका करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुजरातधार्जिणे होत असल्याचा टोला पवार यांनी लगावला होता. त्यावर भाष्य करताना, नरेंद्र मोदी यांनी पवारांनाच गुरुस्थानी मानले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्रातील गुंतवणूक गुजरातकडे वळवण्यात येत असल्याचे पवार म्हणाले होते. यावर, हा आरोप गंभीर असल्याचे आग्रलेखातून मान्य करण्यात आले आहे.

Last Updated : Oct 12, 2019, 1:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details