मुंबई- शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या समर्थक आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिवसेनेचे सदा सरवणकर आणि मंगेश कुडाळकर हे गुजरातला रवाना झाले. हे आमदार गुवाहाटीला पोहोचले आहेत. पक्ष फोडणाऱ्या नेत्यांबाबत शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबतचा व्हिडिओ समोर आला आहे.
शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे गुलाबराव पाटील ( Gulabrao Patil ) हे गुवाहाटीत एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहे. गुलाबराव पाटील यांच्यासोबत आणखी दोन शिवसेनेचे आमदार तिथे गेले आहेत. गुलाबराब पाटील यांच्यासह आमदार योगेश कदम ( MLA Yogesh Kadam ) , मंजुळा गावित, चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) हे आमदार ते पोहोचले आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष आज शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली वाय बी चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक होणार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ शिंदे यांचे बंड ही अंतर्गत बाब असल्याची भूमिका घेतली आहे. असे असले तर महाविकास आघाडी सरकार वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. पक्ष फोडणाऱ्या नेत्यांबाबत शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबतचा व्हिडिओ समोर आला आहे.
महाराष्ट्रहितासाठी निर्णय घेणे गरजेचे-मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या फेसबुक संवादनंतर एकनाथ शिंदे यांनी ट्विट ( Eknath Shinde tweet ) केले आहे. गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला आणि शिवसैनिक भरडला गेला. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे, शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे, अशा आशयाचे ट्विट एकनाथ शिंदेंनी केले आहे. शिवाय पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक असल्याचेही शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे आता महाराष्ट्रहितासाठी निर्णय घेणे गरजेचे असल्याचेही शिंदे यांनी म्हटले आहे.