महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

शिवसेनेतर्फे मनसेला निवडणूक लढण्यासाठी शुभेच्छा; अपप्रचार न करण्याचाही दिला सल्ला

मनसेच्या या निर्णयाला विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच न्यूजसेन्स वॅल्यू मिळवण्यापेक्षा लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मनसेने पुढे यावे, अशा सल्लाही शिवसेनेने मनसेला दिला आहे. .

मुंबई

By

Published : Sep 24, 2019, 7:51 AM IST

मुंबई- महाराष्ट्रात शिवसेना अग्रेसर पक्ष आहे. प्रथम ती, माऊली संवाद सारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवसेना लोकांपर्यंत पोहचत आहे. आदित्य ठाकरे हे लोकांचे प्रश्न घेऊन पुढे येत आहेत. मनसेने दुसऱ्यांचा प्रचार किंवा अपप्रचार करण्यापेक्षा त्यांनी स्वतः साठी प्रचार करून लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी पुढे यावे, अशी परखड प्रतिक्रिया शिवसेना आमदार व प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे यांनी दिली आहे. तसेच मनसेने विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी शिवसेनेतर्फे मनसेला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

शिवसेना आमदार व प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे

हेही वाचा - पुण्यात भाजपचा पश्चिम महाराष्ट्र विजय संकल्प मेळावा; उदयनराजेंची दांडी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या मध्यवर्ती कार्यालय राजगड येथे नुकत्याच विभाग अध्यक्षांकडून निवडणूक लढवण्याबाबत आढावा घेण्यात आला. त्या आढाव्याचा अहवाल मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सादर केला. त्यानंतर मनसे निवडक 100 जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा - गांधी १५० : गांधीजींच्या विचारांनी प्रेरित झालेले देशोदेशींचे 'गांधी'

मनसेच्या या निर्णयाला विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच न्यूजसेन्स वॅल्यू मिळवण्यापेक्षा लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मनसेने पुढे यावे, अशा सल्लाही शिवसेनेने मनसेला दिला आहे. .

ABOUT THE AUTHOR

...view details