मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेची सत्ता जाऊन, विधानसभेतील ( Assembly ) सेनेचे संख्याबळ ही कमी झाले आहे. परिषदेत मात्र सेनेचे संख्याबळ अधिक आहे. विधान परिषदेवर ( Legislative Council ) विरोधी पक्ष नेतेपदाचा शिवसेनेकडून ( Shiv Sena ) दावा करणार असल्याचे शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिरे ( MLA Sachin Ahire ) यांनी सांगितले आहे. मुंबईत प्रसामाध्यमाशी ते बोलत होते.
महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले -राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या पाठिंब्याने महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले होते. शिवसेनेकडे सर्वाधिक 56 आमदार होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी बंड केल्याने 40 आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे यांच्या गटात सामील झाले. राज्यातील मविआ आघाडी सरकार यामुळे कोसळले. भाजपच्या मदतीने बंडखोर नेते एकनाथ शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे सध्या विधानसभेत संख्याबळ कमी आहे. मात्र, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या तुलनेत विधान परिषदेत सर्वाधिक 13 आमदार शिवसेनेचे आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष नेत्यावर शिवसेनेकडून दावा सांगण्यात आला आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात या संदर्भात मागणी करू अशी माहिती सचिन अहिरे यांनी दिली आहे. विरोधी पक्षनेते पदी कोणाची वर्णी लागेल, हे सांगण्यासाठी नकार दिला. दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकी दरम्यान सोबत असलेले सहकारी वेगळ्या प्रवाहात गेल्याची खंत अहिरे यांनी व्यक्त केला आहे.