मुंबई - विधानपरिषदेच्या निवडणुकीची ( Vidhan Parishad Election 2022 ) रणधुमाळी सुरु असताना शिवसेनेचा 56 वा वर्धापन दिन ( Shivsena Vardhapan Din 2022 ) पवईतील वेस्ट ईन हॉटेलमधून साजरा केला जाणार आहे. वर्धापन दिनाची जय्यत तयारी शिवसेनेकडून सुरु झाली आहे. दुपारी 12 वाजता ऑनलाईन पध्दतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेचा टीझर प्रदर्शित -वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेचा टीझर प्रदर्शित ( Shivsena Vardhapan Din Teaser ) झाला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जुन्या भाषणातील, 'भगवा फडकवण्यासाठी सज्ज असलेल्या शिवसैनिकांना मानाचा मुजरा,' या वाक्याने टीझरची सुरुवात आहे. शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या भाषणातील हिंदुत्वाबाबत केलेली विधानेसुद्धा या टीझरमध्ये आहेत.
काय आहे टीझरमध्ये?- 'भगवा फडकवण्यासाठी सज्ज असलेल्या शिवसैनिकांना मानाचा मुजरा, महाराष्ट्र कोणी जगवला नसून मराठी रक्ताने जगवला आहे. शिवसेनेने जगवला आहे. हा वारकऱ्यांचा भगवा आहे, छत्रपतींचा भगवा आहे, होय हिंदू आणि हिंदुत्वाचा भगवा आहे. शिवसेनेचे हिंदुत्व साफ है, रघुकुल रीति सदा चली आई प्राण जाय पर वचन ना जाय. हृदयात राम आणि हाताला काम असे आमचं हिंदूत्व आहे,' असेही या टीझमरध्ये म्हणण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री करणार मार्गदर्शन -राज्य विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी 20 जून रोजी मतदान होणार आहे. गुप्त मतदान प्रक्रियेमुळे सर्वच राजकीय पक्षांनी आमदारांना नजरकैदेत ठेवले आहे. शिवसेनेचे आमदार हॉटेल वेस्ट ईन मध्ये थांबले आहेत. त्यातच शिवसेनेचा आज ( 19 जून ) वर्धापन दिन आहे. शिवसेनेच्या प्रत्येक वर्धापनदिन सोहळ्याला राजकीय महत्त्व असते. कोविडमुळे गेली दोन वर्ष शिवसेनेचा वर्धापन दिन ऑनलाईन पध्दतीने साजरा केला जातो आहे. यंदाचाही वर्धापन दिन ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर हॉटेलच्या सभागृहात सजावट करण्यात आली आहे. सुमारे दीडशे ते दोनशे व्यक्ती बसतील, एवढ्या खुर्च्यां मांडण्यात आल्या आहेत. थोड्याच वेळात मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असणाऱ्या राजकीय नाट्यावर मुख्यमंत्री कसा प्रहार करणार?, हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा -Shivsena Foundation Day : शिवसेना नावाचा 56 वर्षाचा झंझावात! कशी राहिली आहे शिवसेनेची राजकीय वाटचाल? वाचा सविस्तर...