मुंबई -उद्धव ठाकरे यांनी रविवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली, यावेळी बोलताना ठाकरे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे ;
- जणूकाही आभाळ फाटले आणि हे संकट ओढवले अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या परिस्थितीतून लवकरात लवकर बाहेर पडण्याची गरज असल्याचे ते यावेळी म्हणाले.
- पूरस्थितीचा खंबीरपणे सामना करणे गरजेचे आहे, शिवसेना पूरग्रस्तांच्या पाठीशी आहे.
- पुराच्या संकटात आपण राजकारण बाजूला ठेवले पाहिजे, असे आवाहन त्यांनी विरोधकांना केले.
- पूरग्रस्तांच्या आरोग्याचा प्रश्न महत्वाचा आहे, जवळपास १०० डॉक्टरांची टीम आम्ही पाठवली आहे.
- शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, आमदार राजेश क्षीरसागर खासदार धैर्यशील माने आणि संजय मंडलीक यांच्यासह शिवसैनिक नागरिकांसोबत पाण्यात राहून मदतकार्य करत आहेत.