महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Shivsena Symbol dhanushban Hearing : धनुष्यबाण कुणाचा ? निवडणूक आयोगासमोर आज सुनावणी - Shivsena dhanushban Result Today

शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर दावा सांगणार्‍या, एकनाथ शिंदे गटातर्फे आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर (Hearing before Election Commission) बाजू मांडली जाणार (Shivsena Symbol dhanushban Hearing) आहे.

Shivsena Symbol dhanushban Hearing
धनुष्यबाण कुणाचा ?

By

Published : Oct 7, 2022, 9:50 AM IST

मुंबई : शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर दावा सांगणार्‍या, एकनाथ शिंदे गटातर्फे आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर (Hearing before Election Commission) बाजू मांडली जाणार (Shivsena Symbol dhanushban Hearing) आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीची अधिसूचना आजच निघणार असताना शिंदे गट निवडणूक आयोगापुढे दाखल होत आहे. पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला शिवसेनेचे निवडणूक चिन्ह मिळू नये, यासाठी शिंदे गटाचा आग्रह (Shiv Sena Thackeray or Shinde) असेल.

शिंदेंचं निवडणूक आयोगाला पत्र -शिवसेनेच्या धनुष्यबाण निवडणूक चिन्हावर दावा करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी, ६ ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे. अर्जात शिंदे यांनी धनुष्यबाण निर्णयाची मागणी केली आहे. शिंदे गटाने अर्जात उद्धव ठाकरे गटाला आमदारांचा पाठिंबा नसल्याचा दावा केला आहे. शिंदे यांनी धनुष्यबाणाच्या वादावर तातडीने सुनावणी करून याचिका निकाली काढण्याची मागणी केली (Shivsena dhanushban) आहे.



आजचा दिवस महत्वाचा -शिवसेनेच्या निवडणूक चिन्हासाठी ठाकरे आणि शिंदे गटात सुरू असलेल्या लढतीत आजचा 7 ऑक्टोबर हा दिवस दोन अर्थाने महत्त्वाचा आहे. कारण निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षांना कागदपत्रे जमा करण्यास सांगितले असले, तरी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठीही उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही निवडणूक आयोगाने कागदपत्रे सादर करण्यासाठी 7 ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली आहे. आता, या कागदपत्रांवर निवडणूक आयोग निर्णय घेणार की, निवडणुकांच्या घोषणेच्या वेळी परिस्थिती लक्षात घेऊन शिवसेना चिन्ह कायम ठेवणार हे पाहावे लागेल. अशा स्थितीत पुढील तीन दिवस महत्त्वाचे ठरणार (Shivsena dhanushban Result Today) आहेत.



दरम्यान, यापूर्वी जुलैमध्ये शिंदे गटानेही शिवसेनेच्या निवडणूक चिन्ह धनुष बाणावर दावा केला होता. निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात, शिंदे गटाने खरी शिवसेना असल्याचा दावा केला होता. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या मान्यतेचा हवाला दिला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details