मुंबई- महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमिताभ बच्चन आणि अक्षयकुमार यांना इशारा दिल्यानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी नाना पटोले यांच्या विधानाचे समर्थन केले आहे. तर भाजपचे आमदार राम कदम यांनी महाराष्ट्र ही कुणा एकट्याची जहागिरी नसल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अॅक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत. त्यांनी अभिनेत्यांवर टीका केल्यानंतर आमदार राम कदम, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. तर शिवेसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी नाना पटोलेंच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.
हेही वाचा-भंडारा जिल्हा रुग्णालयातील जळीतकांड प्रकरणी दोन परिचारिकांवर गुन्हा दाखल
भाजपचे आमदार राम कदम यांनी नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, महाराष्ट्र ही कुणा एकट्याची जहागिरी नाही, काँग्रेसने ध्यानात ठेवावे. देशाच्या हितासाठी जेव्हा कुणी काही बोलेल त्यांच्या पाठिशी महाराष्ट्र मागे उभा राहिल, असेही कदम यांनी म्हटले.
आमदार राम कदम यांची प्रतिक्रिया हेही वाचा-छत्रपती शिवाजी महाराजांचे तेज संपूर्ण जगात पसरवणार- मुख्यमंत्री ठाकरे
शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी नाना पटोलेंच्या या आक्रमक भूमिकेचे स्वागत केले. त्यांची ही वैयक्तिक प्रतिक्रिया आहे. जर नाना शिवसेनेसारखे आक्रमक झाले असतील तर त्याला आमचा पाठिंबा आहे. पेट्रोलच्या दरवाढीवर हे अभिनेते गप्प का ? हा प्रश्न तर आहे! त्यावर अभिनेते बोलून कधी बोलणार हादेखील एक प्रश्न आहे, असे अरविंद सावंत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
खासदार अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नानांवर टीका करताना म्हणाले की, अभिनेत्यावर टीका करून दिवसभर चर्चेत राहणे सोपे असते. म्हणून हा पब्लिसिटी स्टंट नानाकडून करण्यात आला आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे विधान काय म्हणाले होते नाना पटोले?
पेट्रोल, डिझेल दरवाढीने नागरिक त्रस्त झाले आहेत. सामन्य नागरिकांनी कसे जगावे हा खरे तर प्रश्न आहे. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या सरकारच्या काळात सिने अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार टि्वटरच्या माध्यमातून टिव टिव करायचे. सरकारवर ट्विटच्या माध्यमातून टीका करायचे. शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत होते. मात्र आता त्यांनादेखील विसर पडला आहे, अशी नाना पटोले यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती.