मुंबई - मशिदीवरील बेकायदेशीर भोंगे ( Mosque Loudspeaker Controversy ) उतरलेच पाहिजे, याबाबतचा बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडीओ राज ठाकरे ( Raj Thackeray Tweet Balasaheb Thackeray Video ) यांनी ट्विट करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, राज ठाकरे यांच्या व्हिडीओला शिवसेनेनेदेखील ( Shivsena Criticized Raj Thackeray By Balasaheb Video ) व्हिडीओनेच उत्तर दिले आहे. शिवसेनेकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडीओ व्हायरल करण्यात आला असून या व्हिडीओमधून बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे यांच्यावर टीका करताना दिसत आहे. राज ठाकरेंच्या व्हिडीओला शिवसेनेकडून आता व्हिडीओतूनच उत्तर दिले असल्याची चर्चा आहे.
शिवसेनेकडून बाळासाहेबांचा व्हिडीओ पोस्ट -राज ठाकरे यांची विचारसरणी कशी बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून वेगळी आहे, हे सांगण्याचा प्रयत्न बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कमधल्या या भाषणातून केला होता. त्याच भाषणाचा काही भाग व्हिडीओद्वारे शिवसेनेकडून आता व्हायरल करण्यात येत आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा व्हिडीओ ट्विट करून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केल्यानंतर, त्यांच्या व्हिडीओला शिवसेनेकडून आता व्हिडीओतूनच उत्तर दिले जात आहे.