मुंबई -औरंगाबादमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ८ जुनला जाहीर सभा होणार आहे. अटी व शर्तींवर या सभेला परवानगी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर सेनेचा दुसरा टिझर प्रदर्शित झाला ( Shivsena Release Second Teaser ) आहे. 'सत्ता असो वा नसो, मला पर्वा नाही. मात्र, आमचे हिंदुत्व तकलादू नाही,' अशा सुरात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विरोधकांचा समाचार घेताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेत उद्धव ठाकरे कोणावर निशाणा साधतात याकडे सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले ( Uddhav Thackeray Aurangabad Sabha ) आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील बिकेसी मैदानात जाहीर सभा घेत भाजपा आणि मनसेवर सडकून टीका केली होती. भाजपाने यानंतर उत्तर भाषिक मेळावा घेत, तर मनसेने पुण्यात सभा घेऊन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या संभाजीनगर नामकरणावरून उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली होती. आता औरंगाबादमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. या सभेचा दुसरा टिझर प्रसिद्ध केला आहे. शिवसेना नेते, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Minister Aaditya Thackeray ) सभेपूर्वी नतमस्तक होताना, तर शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Shivsena Leader Balasaheb Thackeray ) यांचे 'शिवसेना जात-पात मानत नाही, शिवसेनेचा हा भगवा झेंडा डौलाने जबरदस्त तेजाने फडकत राहिला पाहिजे,' असे भाषणातील वाक्याचा वापर करण्यात आला आहे. तसेच, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे 'सत्ता असो वा नसो, मला पर्वा नाही. पण आमचं हिंदुत्व हे तकलादू नाही, सच्चा आहे', असे वाक्य वापरण्यात आले आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्या भाजपाला उद्धव ठाकरे यांनी, अशा शब्दात खडसावले होते. हेच वाक्य दुसऱ्या टीझरमध्ये वापरून भाजपा आणि मनसेला सूचक इशारा देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.