महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Shinde Group ठाकरेंना आणखी एक धक्का शिंदे गट दादरमध्ये उभारणार प्रतिशिवसेना भवन - शिंदे गट शिवसेना भवन मराठी बातमी

शिंदे गटाने प्रति शिवसेना भवन दादरमध्ये उभारण्याचा नवा नारा दिला आहे. हजारो नागरिकांना भेटण्यासाठी मुंबईच्या मध्यवर्ती भागात एखादे प्रशस्त कार्यालय हवे, असा मानस एकनाथ शिंदे यांचा आहे. त्याच पार्श्वभूमीवर हे प्रतिशिवसेना भवन उभारले जाणार shinde group build new shivsena bhavan in dadar आहे.

shivsena bhavan
shivsena bhavan

By

Published : Aug 12, 2022, 6:40 PM IST

मुंबई - शिवसेनेत बंडखोरी केलेल्या शिंदे गटाने दादरमधील शिवसेना भवन ताब्यात घेण्याच्या घोषणा केली. मात्र, शिवसैनिक आक्रमक झाल्यानंतर शिंदे गटाने सारवासारव केली होती. आता पुन्हा प्रति शिवसेना भवन दादरमध्ये उभारण्याचा नवा नारा दिला आहे. बंडखोर गटाचा नारा प्रत्यक्षात उतरणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार shinde group build new shivsena bhavan in dadar आहे.

सेनाभवनातून महाराष्ट्रासह देशात शिवसेनेचा दबदबा शिवसेनेचा दबदबा असलेला दादर परिसर हा मुंबईचा मध्यवर्ती भाग आहे. येथे बाळासाहेबांचे स्मृतीस्थळ आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दादरच्या शिवसेना भवनातून पक्षाचा कारभार हाकला. जवळपास शिवसेनेच्या सहा दशकांच्या आठवणी या दादरशी, शिवाजी पार्काशी जोडल्या गेल्या आहेत. येथील सेनाभवनातून महाराष्ट्रासह देशात शिवसेनेचा दबदबा निर्माण केला. राज्यातील शिवसेनेच्या शाखा सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचे व्यासपीठ मानले जाते. अनेकांना जिथल्या तिथे न्याय दिला गेला, अनेकांच्या राजकीय आयुष्याला याच शिवसेना भवनातून कलाटणी मिळाली.

दादरमध्ये प्रतिशिवसेना भवन उभारण्याची घोषणा शिवसेना भवनावर डोळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना सोबत घेऊन सुरतमध्ये जाऊन पक्षाविरोधात बंड पुकारला. शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मविआचे सरकार कोसळले. शिवसेना आणि शिंदे गट असा वाद यानंतर सुरु झाला आहे. वादानंतर शिंदे गटाने शिवसेना भवनावर बंडखोर एकनाथ शिंदे गटाने दावा सांगण्यास सुरुवात केली होती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आक्रमक पवित्रा घेतल्यांतर शिंदे गटाचा दावा मागे पडला. शिंदे गटाने शिवसेनेला आव्हान देण्यासाठी दादरमध्ये प्रतिशिवसेना भवन उभारण्याची घोषणा केली आहे. बंडखोर गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी याबाबत माहिती दिली.

एकनाथ शिंदेंची इच्छाप्रतिशिवसेना भवन उभारणार दादरमध्ये आपल्या पक्षाचे प्रशस्त कार्यालय असावे, अशी एकनाथ शिंदे यांची इच्छा आहे. मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यातील जनता त्यांच्यावर उदंड प्रेम करत आहेत. त्यांना आशीर्वाद देण्यासाठी, त्यांना समर्थन दर्शविण्यासाठी अनेक लोक त्यांना भेटत आहेत. सर्वसामान्य नागरिक त्यांचे प्रश्न घेऊन ते एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मुंबईला येत असतात. तसेच, मुंबईकर नागरिक देखील आपल्या अडीअडचणी सांगण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी घेतात. या हजारो नागरिकांना भेटण्यासाठी मुंबईच्या मध्यवर्ती भागात एखादे प्रशस्त कार्यालय हवे, असा मानस एकनाथ शिंदे यांचा आहे. लवकरच त्या दिशेने पावले टाकली जातील, अशी माहिती बंडखोर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी दिली.

हेही वाचा -भाजपात खांदेपालट प्रदेशाध्यक्षपदी Chandrashekhar Bawankule तर मुंबई अध्यक्षपदी आक्रमक मराठा चेहरा

ABOUT THE AUTHOR

...view details