मुंबई -महाराष्ट्रात सुरू असलेला सत्ता संघर्ष आता सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोचला आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या गटाने सर्वोच्च न्यायलायात धाव घेतली आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी 16 आमदारांना अपात्र आणि गटनेता कारवाईसाठी पाठवलेल्या नोटीसीविरोधात शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर सोमवारी ( 27 जून ) सुनावणी होण्याची शक्यता ( shivsena rebel mla group filed petition in supreme court ) आहे.
शिवसेनेने विधिमंडळाच्या गटनेतेपदी अजय चौधरी यांची नियुक्ती केली आहे. तसेच, नरहरी झिरवळ यांनी बंडखोर 16 आमदारांना नोटीस बजावली आहे. त्यांना 48 तासांच उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याची मुदत सोमवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत असेल. या दोन मुद्यांविरोधात शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत शिंदे गटाकडून तीन मुद्दे दाखल करण्यात आले आहे. तसेच, शिंदे गटाकडून उपाध्यक्ष यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याकरिता तयारी सुरू झाली आहे. या संदर्भातील पत्र देखील विधानसभा सचिवांना पाठवण्यात आले आहे.