मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचा शिवसेनेकडून तीव्र शब्दात ( Shivsena protest against MH governor ) निषेध करण्यात आला. राज्यपाल चले जावच्या घोषणा देत मुंबईत ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत माफी मागत नाहीत, तोपर्यंत राज्यभरात निषेध आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार शिवसैनिकांनी यावेळी केला.
समर्थ रामदास नसते तर छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी विचारले नसते, असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( Bhagatsingh Koshyari statement on Shivaji ) औरंगाबाद जिल्ह्यात केले. राज्यभरात याचे पडसाद उमटत आहेत. राज्यपालांनी माफी मागावी, अशी आग्रही भूमिका भाजप व्यतिरिक्त इतर सर्वच राजकीय पक्षांनी घेतली आहे. सोशल माध्यमातूनही राज्यपालांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया ( Anger in Social Media on MH governor ) उमटत आहेत.
राज्यपालांच्या वक्तव्याचा शिवसेनेकडून निषेध हेही वाचा-Bacchu Kadu slammed MH governor : राज्यपालांनी मूर्खपणा केला- बच्चू कडू संतापले
धोती फाड आंदोलन
शिवसेनेने मुंबईतील अनेक भागात राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या विरोधात तीव्र आंदोलन केले. गिरगाव येथे कबुतर खाना येथे विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली धोती फाड आंदोलन करण्यात आले. 'काळी टोपी, काळी नीती', राज्यपाल चले जावे असे फलक घेऊन आंदोलन करण्यात आले. दादर पश्चिमेला नगरसेविका प्रीती पाटणकर, विभाग प्रमुख यशवंत विचले यांनी आंदोलन केले. त्यानंतर शिवसेना भवनपर्यंत निषेध रॅली काढली.
हेही वाचा-Governor Controversial Statement Issue : खासदार फौजिया खानसह मराठा समाजाकडून राज्यपालांच्या 'त्या' विधानाचे निषेध
जनता धडा शिकवेल
वरळी नाका येथे महापौर किशोरी पेडणेकर, शिवसेना नेते सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. केंद्रातून आलेले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सतत विविध विषयावर वादग्रस्त विधान करत असतात. आता ही छत्रपती शिवाजी महाराजांना विधान केले. महाराष्ट्रात महाराजांवर वादग्रस्त विधान करण्याचे त्यांचे धाडसच कसे झाले, असे मुंबईच्या महापौर आणि शिवसेना प्रवक्त्या किशोरी पेडणेकर म्हणाल्या. राजकारणासाठी शिवरायांचा वापर करणारी भाजपा आज अपमान झाला तरी साधा ब्र काढायला तयार नाही. ते आहेत कुठे असा प्रश्न यावेळी उपस्थित केला. राज्यपालांनी माफी न मागितल्यास जनता धडा शिकवेल, असा इशारा महापौरांनी दिला.
हेही वाचा-Pandharpur Bandh : पंढरपूर बंदला संमिश्र प्रतिसाद, राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी
निषेधाचे फलक आणि घोषणा
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याचा शिवसेनेने आज निषेध केला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांनी माफी मागावी, चले जावं राज्यपाल, 'क्या यही तेरी होश्यारी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी', भाजपाविना राज्यपाल आणि राज्यपाल विना भाजपा असे फलक घेऊन शिवसेनेने राज्यपालांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काळे झेंडे घेऊन, आणि काळ्या फिती बांधून मोठ्या संख्येने शिवसैनिक आंदोलनात उतरले होते.Conclusion: