मुंबई - राहुल गांधी हे कमकुवत नेते आहेत’ असा प्रचार करूनही गांधी अजूनही उभे आहेत आणि मिळेल त्या मार्गाने वारंवार सरकारवर हल्ले करत आहेत. माध्यमांच्या मानेवर सुरे ठेऊन विरोधी पक्षाला कमकुवत केले जाईल. मात्र विरोधी पक्ष हा कधीतरी फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखतून उभा राहिल आणि तेव्हा दाणादाण उडेल. देशाचा इतिहास हेच सांगतो. राहुल गांधीचे भय दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना वाटते लढणारा एकटा असला तरी हुकूमशहाला वाटते व हा एकटा योद्धा प्रामाणिक असेल तर भय शंभर पटीने वाढत जाते आणि राहुल गांधींचे भय त्या शंभर पटीतले आहे, अशा शब्दात शिवसेनेने मुखपत्र सामना मधून राहूल गांधीचे कौतुक करत केंद्रातील भाजप सरकारवर विरोधकांच्या गळे दाबण्याच्या प्रयत्नावरून कोरडे ओडले आहेत.
तो योगायोग नक्कीच नाही-
राहुल गांधी हे पुन्हा काँग्रेसचे अध्यक्ष होत आहेत ही चांगली गोष्ट आहे. भाजपासाठी मोदीशिवाय आणि काँग्रेससाठी गांधीशिवाय कोणता पर्याय उरला नाही. हे सत्य स्वीकारायला हवे. काही कालावधीसाठी पक्ष संघटनेपासून राहुल गांधी दूर गेल्याने पक्षावरची पकड जरा कमकुवत झाली होती. मात्र राहुल गांधी आता पुन्हा येत आहेत. त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष पद स्वीकारयाची तयारी दर्शवली आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपद स्वीकारण्याचे निश्चित होताच दुसरीकडे प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांच्या घरावर आयकर विभागाची छापेमारी झाली. म्हणजे हा योगायोग नक्कीच नाही.
रॉबर्ट हे सोनिया गांधी यांचे जावई आहेत. ते सोडून जरी दिले तरी वढेरा यांच्याशी अनेक वाद जोडले गेले आहेत. मात्र केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरपोयग करत गांधी परिवारास त्रास देणे हे योग्य नसल्याची टीका शिवसेनेने भाजपा सरकारवर केली आहे.
ईडीची राजकीय निष्ठा -
राहुल गांधी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष होत आहेत. त्याच वेळी रॉबर्ट वढेरा यांच्या बेहिशोबी संपत्तीचे कारण पुढे करत आयकर विभागाचे अधिकारी त्याच्या घरी पोहोचले. आयकर विभाग आणि ईडी सारथ्या संस्था खुपच प्रामाणिक आहेत. त्यांच्या राजकीय निष्ठेवर केव्हाच संशय व्यक्त केला जाऊ शकत नाही. जोपर्यंत राजकीय मालक इशारा करत नाहीत तोपर्यंत हेये निष्ठावान लोक विनाकारण कोणाच्या उंबऱ्यावर जात नाहीत. त्यामुळे या लोकांना दोष देण्यात काही अर्थ नाही, असा उपरोधिक टोला ईडी आणि आयकर विभागाला लगावण्यात आला आहे.
राजकीय पोटदुखीवर लसीची गरज-
राहुल गांधी पुन्हा काँग्रेसचे अध्यक्ष होत आहेत आणि यामुळे बरेच काही होणार आहे. कोविड-१९ ची प्रतिबंधात्मक लस वैज्ञानिकांनी शोधली. मात्र, एखादी लस राजकीय पोट दुखी आणि राजकारणातील सुडाची भावनेसाठी बनवली असती तर किती बरे झाले असते, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.
गांधी परिवारातील सदस्यांकडून खरचं कोणता गुन्हा झाला असता, तर त्यांच्या कारवाई होऊ नये असे कोणी म्हणणार नाही. मात्र, अशा प्रकारच्या गुन्ह्यांच्या आरोपांचा नियोजनापूर्वक प्रचार केला जातो किंवा त्याचा फास आवळला जातो. जाणीवपूर्वक अशा गोष्टी पसरवल्या जातात, त्यावेळी या घटनाक्रमा मागील राजकारण स्पष्ट होते.