मुंबई -शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख म्हणून मान्यता देण्यात आली असून पक्षांसंदर्भातील प्रत्येक निर्णय घेण्याचे अधिकार उद्धव ठाकरे यांना देण्यात आले असल्याची माहिती आहे. या बैठकीत पाच ठराव मंजूर करण्यात आले आहे. दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्ला केला. हिम्मत असेल तर तुमच्या बापाच्या नावाने मत मागा आणि निवडून या, असे आवाहन त्यांनी एकनाथ शिंदे यांना दिले.
सर्वाधिकार उद्वव ठाकरेंकडे -शिवसेनेच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे प्रस्ताव खासदार संजय राऊत यांनी मांडले. यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव वापरता येणार नाही. याबाबतही चर्चा झाली. तसेच भविष्यात कुणी बंड केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार पक्ष प्रमुखांकडे राहील, हा प्रस्तावही या बैठकीत घेण्यात आला. यासोबतच मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाची प्रतारणा करणार नाही आणि आगामी महानगरपालिका निवडणुकीत भगवा फडकविणार, निर्धारही या बैठकीत करण्यात आला. त्यामुळे आता पक्ष श्रेष्ठी म्हणून उद्धव ठाकरे बंडखोर आमदारांवर काय कारवाई करणार, का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेच्या बैठकीतील प्रस्ताव -
- बंडखोरांवर कारवाईचे अधिकार उद्धव ठाकरेंकडे -
बंडखोर आमदारांवर कारवाईचे सर्व अधिकार उद्धव ठाकरेंकडे आहेत. बेईमानी करणाऱ्यांवर शिवसेना पक्षप्रमुख थेट कारवाई करू शकतात. बंडखोरांवर कारवाईचे थेट आणि सर्व अधिकार ठाकरेंकडे असणार आहे.
- आधी नाथ होते आता दास झाले