महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sanjay Raut on MLA Suspension: 'लोकशाही मृत्यूपंथाला…' सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर संजय राऊतांची नाराजी - संजय राऊत वाईन विक्री परवानगी

सुपर मार्केटमधून वाईन विक्रीला दिलेली परवानगी हा शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव मिळेल. वाईनला विरोध करणाऱ्यांनी शेतकऱ्यांचं आर्थिक गणितही समजून घ्यावं. वाईन विक्रीच्या निर्णयाला विरोध करणारे शेतकऱ्यांचे शत्रू आहेत, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत
संजय राऊत

By

Published : Jan 28, 2022, 11:35 AM IST

Updated : Jan 28, 2022, 12:18 PM IST

मुंबई- सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निकाल देत भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द केलं आहे. सुप्रीम कोर्टाने भाजपाच्या आमदारांना दिलासा देताना राज्य सरकारला मोठा झटका दिला आहे. हे निलंबन असंवैधानिक तसेच बेकायदेशीर असल्याचे सांगत सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. तसंच निलंबन करायचं होतं तर ते फक्त एका अधिवेशनापुरतंच असायला हवं होतं असेही ताशेरे ओढले. दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी नाराजी जाहीर केली आहे. न्यायालयाचा हस्तक्षेप, राज्यघटनेसंदर्भात गृहमंत्रालयाचा हस्तक्षेप, सत्ताधारी पक्षाचा हस्तक्षेप हे लोकशाही मृत्यूपंथाला लागल्याचं चिन्ह आहे असंही यावेळी ते म्हणाले.

'वाईन विक्रीच्या निर्णयाला विरोध करणारे शेतकऱ्यांचे शत्रू'

राज्य सरकारने सुपर मार्केटमधून वाईन विक्रीला दिलेली परवानगी हा शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव मिळेल. वाईनला विरोध करणाऱ्यांनी शेतकऱ्यांचं आर्थिक गणितही समजून घ्यावं. वाईन विक्रीच्या निर्णयाला विरोध करणारे शेतकऱ्यांचे शत्रू आहेत, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले.

Last Updated : Jan 28, 2022, 12:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details