मुंबई -काँग्रेसला जनतेनेच नाकारले आहे. त्यामुळे राजीनामा घेणे-देणे ही त्यांच्या पक्षांतर्गत बाब असली तरी २०१४च्या निवडणुकीत आणि २०१९च्या निवडणुकीत लोकांनी काँग्रेस नेत्यांचा राजीनामा घेतलेला आहे, असे म्हणत शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी काँग्रेसमधील राजीनामासत्राची खिल्ली उडवली आहे.
राहुल शेवाळेंनी उडवली काँग्रेसची खिल्ली; म्हणाले... - Resign
काँग्रेसमध्ये राजीनामासत्र सुरू आहे. या राजीनाम्यावर चुटकी घेताना राहुल शेवाळे यांनी काँग्रेसला जनतेनेच नाकारले असून २०१९च्या निवडणुकीत लोकांनी त्यांचा राजीनामा घेतलेला आहे, असे म्हटले आहे.
काँग्रेस पक्षात सध्या राजीनामासत्र सुरू आहे. 2019 च्या नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. त्यावर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर आता काँग्रेसमध्ये राजीनामासत्र सुरू आहे. देशातल्या अनेक बड्या नेत्यांनी राजीनामा दिल्यानंतर आता मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनीही आज आपला पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यावर चुटकी घेताना राहुल शेवाळे यांनी काँग्रेसला जनतेनेच नाकारले असून २०१९च्या निवडणुकीत लोकांनी त्यांचा राजीनामा घेतलेला आहे, असे म्हटले आहे.