मुंबई - सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरून(Hindutva issue) भाजपकडून शिवसेनेला टार्गेट केले जात आहे. मात्र, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) यांच्यामुळे हिंदुत्वाचा दोर जगाला कळाला. साहेबांनी कधी लाभाचा विचार केला नाही. मुळात आमचे हिंदुत्व हे शेंडी जाणव्याचे नसून राष्ट्रीयत्वाला धरून आहे, अशा शब्दात शिवसेना खासदार अरविंद सावंत(Shivsena MP Arvind Sawant) यांनी भाजपला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून खडेबोल सुनावले.
शिवसेना खासदार अरविंद सावंत - हिंदुत्व राष्ट्रीयत्वाला धरून -
बाळासाहेब आमच्या हृदयात आजही भिनलेले आहेत. आजच्या दिवशी बाळासाहेबांच्या आठवणीने मन दाटून येते. त्यांच्या भाषणाच्या वेळी बाळासाहेब नेहमीच शिवसैनिकांना ऊर्जा आणि स्फूर्ती देण्याचे काम करायचे. त्यांचे जातीविरहित भक्त होते. बाळासाहेबांनी राष्ट्रहित प्रथम पाहिले, त्यांच्यामुळेच आज हिंदुत्वाचा दोर जगाला कळाला. राजकीय लाभाचा त्यांनी कधीच विचार केला नाही. न्यायालयातही धर्मनिरपेक्ष शपथ घेण्यासाठी घटनेवर हात ठेवून साक्ष घेण्याची सूचना बाळासाहेबांनी केली होती. सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू-मुस्लिमांच्या डीएनए एक असल्याचे म्हटले होते. मात्र आमचे हिंदुत्व राष्ट्रीयत्वाला धरून आहे, असे सावंत म्हणाले.
आज बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी असताना भाजपकडून विविध कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यात येत आहे. हे सर्व दांभिक आहे. त्यामुळे भाजपने बाळासाहेबांचे नाव घेणे सोडावे. आम्ही शब्द पाळणारे आहोत. तसेच कंगना, विक्रम गोखले सारख्या प्रवृत्तींना महत्त्व देण्याची गरज नसल्याचे अरविंद सावंत म्हणाले.