मुंबई - राज्यसभेच्या निवडणुकीत ( Rajya Sabha Election Result ) संजय पवार ( Shivsena Candidate Sanjay Pawar ) यांचा झालेला पराभव शिवसेनेच्या चांगलेच जिव्हारी लागला आहे. एकूण आठ मते भाजपकडे गेल्याने धनंजय महाडिक विजयी झाले. नेमके मतांचा आकडा कुठे चुकला, हे आम्ही पडताळून पाहिले. कोण कशा पद्धतीने गेले, याबाबत विचार केला जाईल, असे खासदार अनिल देसाई ( MP Anil Desai ) यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून लक्ष लागून असलेल्या राज्यसभेची निवडणूक काल पार पडली. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव केला. या पराभवाबाबत खासदार अनिल देसाई यांनी भाष्य केले.