महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

शिवसेनेचा मुख्यमंत्री कोण, हे दोन दिवसात समजेल, उद्धव ठाकरे घेणार अंतिम निर्णय

शिवसेनेचा मुख्यमंत्री कोण असेल, हो दोन दिवसात समजेल. तसेच राज्यातील सत्ता स्थापनेतील शिवसेनेबाबतचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आहे. त्यांनी घेतलेला निर्णय सर्वांना मान्य राहील, अशी प्रतिक्रिया आमदार प्रकाश सुर्वे यांनी दिली.

मातोश्रीवर शिवसेना आमदारांची बैठक

By

Published : Nov 22, 2019, 2:41 PM IST

Updated : Nov 22, 2019, 5:19 PM IST

मुंबई- मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत शिवसेना नेते आणि आमदार यांच्यासह उद्धव ठाकरे यांनी आघाडीबरोबर सरकार स्थापन करणे याबाबतीत चर्चा केली.

शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा... राज्यातील २७ महापालिकांमध्ये आज ठरणार महापौर, उपमहापौर

शिवसेना आणि आघाडीतील सर्व पक्षांनी एकत्र येत जर सरकार स्थापन केले, तर किमान समान कार्यक्रम काय असेल, याबाबत तसेच मुख्यमंत्री पदाबाबत या बैठकीत चर्चा झाली. तसेच या बैठकीनंतर आमदारांनी मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत शिवसेना पक्षप्रमुख जो निर्णय घेतील, तो अंतिम निर्णय राहील असे सांगितले आहे. आमदार प्रकाश सुर्वे यांनी येत्या दोन दिवसात सर्व काही समजेल अशी प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा... पवार-ठाकरे यांच्या भेटीनंतर शिवसेना राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता

मातोश्रीवर शिवसेना आमदारांची बैठक पार पडली. यावेळी आमदारांनी उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावे, अशी मागणी बैठकीदरम्यान केली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यांच्यानंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचे नावही आघाडीवर असल्याची माहिती आहे.

Last Updated : Nov 22, 2019, 5:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details