मुंबई अवघ्या काही तासावर येऊन दहीहंडी उत्सव येऊन ठेपला असताना राज्य सरकारने 10 लाखाची विमा योजनेची घोषणा केली. या निर्णयाची कशी अंमलबजावणी करणार, याबाबत सरकारने निवेदन करावे. अशी मागणी शिवसेना करणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी दिली आहे. shivsena MLA Sunil Prabhu विधान भवनात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज्य सरकारने गोविंदा पथकांसाठी मोफत 10 लाखांचा विमा योजना जाहीर केला. मोठ्या प्रमाणात गोविंदा पथक या योजनेच्या प्रतीक्षेत आहे. सरकारकडून अद्याप खुलासा केलेला नाही. अवघ्या काही तासांवर दहीहंडी उत्सव आला आहे. Maharashtra Monsoon Assembly Session या पार्श्वभूमीवर शिवसेना विधान भवनात आवाज उठवणार आहे. कोविडनंतर गोविंदा उत्सव येत आहे. त्यामुळे आनंद असणार आहे. आणि संघाने राज्य सरकारने 10 लाखाचा विमाकवच गोविंदा पथकाला घोषित केला आहे. गोविंदा पथकाला तो कसा पोहचवणार, त्याची अंमलबजावणी कशी असेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत निवेदन करावे, अशी मागणी करणार आहोत, असे शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी सांगितले
आहे.
शेतकऱ्यांचे मोठे नुकसानअतिवृष्टी काळात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने एनडीआरएफच्या निकषांपेक्षा भरीव मदत दिली, अशी घोषणा केली. आमदार सुनील प्रभू यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला. २९३ अन्वेय प्रस्ताव विधानसभेत चर्चेला येणार आहे. राज्य सरकारने एनडीआरएफच्या नावाने कशी फसवणूक केली. यामागे काय सत्य आहे. याची उत्तरे सत्ताधाऱ्यांना सभागृहाला त्यांना द्यावे लागेल, असेही प्रभू म्हणाले आहेत.