महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

आमदार सरनाईक यांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन, 'ईडी'पुढे हजर राहण्याची शक्यता - शिवसेना आमदार प्रताप सरनाईक बातमी

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, विहंग सरनाईक आणि पुर्वेश सरनाईक यांनी सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले.

shivsena-mla-pratap-sarnaik-pays-homage-to-siddhivinayak
आमदार सरनाईक यांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

By

Published : Dec 8, 2020, 5:52 PM IST

Updated : Dec 8, 2020, 6:38 PM IST

मुंबई - शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयावर ईडीने नुकताच छापा टाकला होता. यानंतर सरनाईक यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीसही बजावली होती. त्यानंतरही सरनाईक चौकशीला हजर राहिलेले नव्हते. मात्र, त्यांनी आज दादर प्रभादेवी येथे सहकुटुंब सिद्धिविनायकाचे दर्शन घेत लवकरच चौकशीला सामोर जाण्याचे संकेत दिले आहेत.

कार्यालयावर व घरामध्ये ईडीचा छापा -

राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्यावर शिवसेना आणि भाजपमध्ये सामना सुरू झाला आहे. भाजपकडून शिवसेनेवर केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर देण्याचे काम आमदार प्रताप सरनाईक यांनी केले. रिपब्लिक टीव्हीचे अर्णव गोस्वामी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्याने विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव सादर केला आहे. याचदरम्यान टॉप्स सिक्युरिटीचे मालक यांच्याशी संबंध असल्याच्या संशयाने आमदार प्रताप सरनाईक घरात नसताना त्यांच्या कार्यालयावर व घरामध्ये ईडीने छापा टाकला. त्यावेळी प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

हेही वाचा -'टॉप्स ग्रुप'च्या माजी व्यवस्थापकीय संचालकाला 'ईडी'कडून अटक

तीन वेळा नोटीस -

प्रताप सरनाईक यांनी ईडीच्या चौकशीला हजर राहावे, म्हणून ईडीने आतापर्यंत तीन वेळा नोटीस बजावली आहे. तीन वेळा नोटीस देऊनही सरनाईक चौकशीला हजार राहिलेले नाहीत. महाराष्ट्राबाहेरून आल्याने सरनाईक यांनी स्वतःला क्वारंटाईन करून घेतले होते. क्वारंटाईन असल्याने आपण चौकशीला हजर राहू शकत नाही, असे सरनाईक यांनी ईडीला कळविले होते. आज सरनाईक यांनी पत्नी, मुलगा विहंग आणि पूर्वेशसह दादर प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन श्रीगणेशाचे दर्शन घेत कुटूंबियांवर आलेल्या संकटातून लवकर बाहेर काढ, असे साकडे सिद्धिविनायकाला घातले. सरनाईक यांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्याने ते लवकरच ईडीच्या चौकशीला सामोरे जातील असे संकेत मिळत आहेत.

Last Updated : Dec 8, 2020, 6:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details