महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'सरकारमध्ये सर्व काही आलबेल' कोणतेही मतभेद नसल्याचा एकनाथ शिंदेंचा निर्वाळा - अशोक चव्हाण यांचे वादग्रस्त विधान

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात चांगले काम करत आहे. या सरकारमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचा निर्वाळा मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.

eknath shinde
एकनाथ शिंदे

By

Published : Jan 27, 2020, 7:56 PM IST

मुंबई - सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या वक्तव्यावरून महाविकास आघाडीमध्ये उठलेले वादळ थांबलेले दिसत आहे. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी, राज्यातील सरकार किमान समान कार्यक्रमावर काम करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाच चांगले काम सुरू असून तिन्ही पक्षांमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.

अशोक चव्हाण यांच्या विधानावर मंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा... शिवसेनेवर विश्वास नाही, इतकी लाचारी कशी...

अशोक चव्हाण यांनी नांदेड येथील एका कार्यक्रमात बोलताना, सरकार स्थापन करण्यापूर्वी शिवसेनेकडून घटनाबाह्य काम करणार नाही, असे लिखीत स्वरूपात घेतल्याचे विधान केले होते. यावरून बराच वादंग निर्माण झाला होता. अखेर शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर पडदा टाकत, सर्व काही ठिक आणि सुरळीत चालु असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा... 'हिंदूहृदयसम्राट' नावाचे फलक काढण्याचे राज ठाकरेंचे आदेश; अवघ्या ५ मिनिटात आटोपली बैठक

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, गरिबांना परवडणऱ्या दरात शिवशाही थाळी, असे अनेक विषय मार्गी लावले आहेत. दिलेल्या प्रत्येक आश्वासनांची पूर्ती सरकारकडून केली जात आहे. हे सर्व महाविकास आघाडी सरकारच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग आहे. त्यामुळे सरकार त्या धोरणानुसारच कामकाज करत आहे, असे शिंदे यांनी म्हटले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार चांगले काम करत आहे आणि या सरकारमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचा निर्वाळा एकनाथ शिंदेंनी यावेळी दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details