मुंबई- राज्यात मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत शिवसेनेचा विधानसभा पक्षनेता ठरवला जाणार आहे. या बैठकीसाठी शिवसेना आमदार सेनाभवनात येण्यास सुरुवात झाली आहे.
सेनाभवनात आमदारांची बैठक; विधीमंडळ पक्षनेतेपदी एकनाथ शिंदेंचे नाव आघाडीवर?
आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत शिवसेनेचा विधीमंडळ पक्षनेता ठरवला जाणार आहे. या बैठकीसाठी शिवसेना आमदार सेनाभवनात येण्यास सुरुवात झाली आहे.
आजच्या बैठकीत आदित्य ठाकरेंऐवजी एकनाथ शिंदे यांचेच नाव विधीमंडळ नेतेपदी कायम राहणार असल्याची चर्चा होत आहे. सत्तेत 50 टक्के भाग मिळावा, यासाठी शिवसेनेकडून सध्या शक्य तितके सर्व प्रयत्न केले जात आहेत. जे-जे शक्य होईल ते सर्व करणार, असे सूचक वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केल्याची माहिती आहे. या विधानावरून शिवसेना सत्तेत खाते वाटपाबाबत कोणतीही तडजोड करणार नाही हे स्पष्ट होत असल्याचे दिसत आहे.
हेही वाचा : 'कमळा'चा अवमान; शिवसेना जिल्हा समन्वयकावर गुन्हा दाखल..