महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Manisha Kayande On Pravin Darekar : प्रवीण दरेकर फरार आहेत का?, शिवसेनेने विधानपरिषदेत भाजपाला डिवचले

प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर ते दोन दिवस झाले सभागृहात दिसले नाही. त्यावर दरेकर हे फरार आहेत का?, असा सवाल मनीषा कायंदे यांनी विचारला ( Manisha Kayande On Pravin Darekar ) आहे.

pravin darekar
pravin darekar

By

Published : Mar 16, 2022, 4:47 PM IST

Updated : Mar 16, 2022, 4:57 PM IST

मुंबई - विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकरांवर ( Opposition Leader Pravin Darekar ) गुन्हा दाखल झाल्यापासून दोन दिवस झाले सभागृहात दिसले नाहीत. दरेकर फरार आहेत का, असा प्रश्न माहिती मुद्याखाली शिवसेना नेत्या तथा परिषदेच्या सदस्या मनीषा कायंदे यांनी उपस्थित करत भाजपाला डिवचले ( Manisha Kayande On Pravin Darekar ) आहे. यावेळी विरोधकांनी यावर आक्षेप घेत, गदारोळ घालण्याचा प्रयत्न केला.

मुंबै बँकेच्या कथीत गैरव्यवहार प्रकरणी प्रवीण दरेकर गोत्यात आले आहेत. सहकार कायद्याखाली दरेकर यांच्यावर मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे. विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष जुंपला आहे. सुडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तर, शिवसेनेने दरेकरांच्या अटकेची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ झाल्याने परिषदेचे सुरुवातीला दोन वेळा आणि शेवटी दिवसभरासाठी सभागृह तहकूब करण्यात आले होते.

बुधवारी विधान परिषदेच्या नियमित कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर शिवसेना सदस्या मनीषा कायंदे ( Shivsena Mla Manisha Kayande ) यांनी माहितीच्या मुद्याअंतर्गत दरेकर यांच्या गैरहजेरीबाबत पटावर प्रश्न उपस्थित केला. दरेकरांवर गुन्हा दाखल झाल्यापासून दोन दिवस सभागृहात दिसले नाहीत. ते अटकेत आहेत का? की फरार आहेत? ( Pravin Darekar Is Absconding ) याबाबत माहिती मिळावी, अशी मागणी सभापतींकडे केली. तेव्हा विरोधकांनी गदारोळ करण्यास सुरुवात केली. हा प्रश्न मला विचारला आहे. विरोधकांनी काळजी करण्याची गरज नाही, असे सांगत सभापती रामराजे नाईक - निंबाळकर यांनी गोंधळ घालणाऱ्या विरोधकांना चांगलेच खडसावले.

डावखरे बालिशपणा नको

कायंदे यांच्या मुद्यावरुन भाजपाच्या सदस्यांनी आक्षेप घेत घोषणाबाजीला सुरुवात केली. त्यावेळी निरंजन डावखरे हे पुढे आल्याने सभापतींनी त्यांना फटकारले. डावखरे बालिशपणा नको, असे सांगत मी यावर उत्तर देणार आहे. तुम्ही जाग्यावर जाऊन बसा, अशी सूचना केली.

हेही वाचा -Disha Salian Case : दिशा सालीयन प्रकरणात आम्ही सीबीआयकडे जाणार - नितेश राणे

Last Updated : Mar 16, 2022, 4:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details