मुंबई- राष्ट्रपती राजवट लागू करणे हा राज्यपालांचा अधिकार आहे. शिवसेना कोणत्याही दबावाला बळी पडत नसल्याचे शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी सांगितले. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ९ नोव्हेंबरपासून राष्ट्रपती राजवट लागणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली.
शिवसेना दबावतंत्राला बळी पडणार नाही - डॉ. मनीषा कायंदे - शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे यांची सुधीर मुनगंटीवार प्रतिक्रिया
येत्या 9 ऑक्टोबरपासून राष्ट्रपती राजवट लागणार या सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानावर शिवसेना आमदार व प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
डॉ. मनीषा कायंदे
हेही वाचा -परतीच्या पावसाचा ३२५ तालुक्यांना फटका, तातडीने पंचनामे करण्याचे आदेश - मुख्यमंत्री
मुनगंटीवार यांचे वक्तव्य हे शिवसेनेवर दबावतंत्र करण्यासाठी असल्याचे बोलले जात आहे. त्यावर कायंदे म्हणाल्या की, शिवसेना कोणत्याही दबावतंत्राला बळी पडणार नाही. तसेच राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भात राज्यपाल योग्य तो निर्णय घेतील असेही त्या म्हणाल्या आहेत.
Last Updated : Nov 1, 2019, 8:20 PM IST