मुंबई - शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करुन प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यापेक्षा प्रीती मेनन यांनी आधी आपली ओळख निर्माण करावी. आरेच्या झाडावर आयती प्रितीची फळे रेखाटण्यापेक्षा मेनन यांनी स्वकर्तृत्वाने आपले अस्तित्व सिद्ध करावे, अशी खरमरीत टीका शिवसेना प्रवक्त्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी आम आदमी पक्षाच्या प्रीती मेनन यांच्यावर केली.
प्रतिक्रिया देताना शिवसेना प्रवक्त्या आमदार डॉ. मनीषा कायंदे हेही वाचा- आरे वृक्षतोड प्रकरणी पालिका प्रशासनाचा रेटा कशासाठी - मनीषा कायंदे
कायंदे पुढे म्हणाल्या, आदित्य ठाकरे यांनी अतिशय लहान वयात स्वकर्तृत्वाने शिवसेनेत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. त्याच बरोबर राज्यात आणि देशातील प्रमुख राजकीय नेत्यांमधेही स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केलेली आहे. याउलट आपले कर्तृत्व आणि ओळख काय? आदित्याला पप्पू म्हणून हिणवण्यापेक्षा तुमचा दिल्लीतला नौटंकी अरविंद पप्पू काय दिवे लावतो ते पाहा. राज्याचा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी सपशेल आपटी खाल्ली आहे. त्यांच्याबाबत बोला आणि आपले कर्तृत्व मोजा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
हेही वाचा- 'आरे'वरून 'का'रे.. शिवसेना व भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर