मुंबई- दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी तथा शिवसेना नेते सुधीर जोशी ( Shivsena leader Sudhir Joshi death ) यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात पक्षबांधणीसाठी जोशी ( Balasaheb Supporters death in Mumbai ) यांचे मोठे योगदान मानले जाते.
सुधीर जोशी यांना कोविड १९ संसर्गाची बाधा झाली होती. त्यांच्यावर मुंबईतल्या जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. नुकतेच कोरोनाच्या आजारातून घरी परतले होते. मात्र आज त्यांचे निधन झाले. जोशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी होते, असे मानले जाते. कॅबिनेट मंत्री पदासह शिवसेनेचे मुंबईचे दुसरे महापौर म्हणून जोशी यांचे नाव घेतले जाते.
हेही वाचा-Minister Nawab Malik : आज मंत्री नवाब मलिक हजर होणार चांदीवाल आयोगासमोर
सुधीर जोशी यांचा परिचय ( Shivsena leader Sudhir Joshi biography )
'संस्कृत व सुशिक्षित कार्यकर्त्यांचे मोहोळ लाभलेला' आणि लोभस व्यक्तिमत्त्व असलेला शिवसेना नेता म्हणजे सुधीर जोशी अशी त्यांची ओळख होती. मुंबईचे माजी महापौर तरुण व तडफदार सुधीर जोशी यांच्याकडे सुशिक्षित कार्यकर्त्यांची फौज असलेल्या स्थानीय लोकाधिकार समितीची धुरा बाळासाहेबांनी सोपविली होती. बाळासाहेबांनी त्यांच्यावरील टाकलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरविला. बाळासाहेबांच्या सहकारी नेत्यांतील एक विश्वासू सहकारी नेता म्हणून ते बाळासाहेबांचे जवळचे सहकारी राहिले आहेत.
हेही वाचा-ISIS threatens Yasin Bhatkal : जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील वकिलाला इसिसची धमकी
निर्णय ठरले लोकाभिमुख-
सुधीर जोशी हे १९६८ साली प्रथम नगरसेवक झाले. मुंबई महानगरपालिका गटनेता, विरोधी पक्षनेता म्हणून ते राहिले. १९७३ मध्ये मुंबई महानगरपालिकेचे महापौर झाले तेव्हा ते सर्वांत तरुण महापौर होते. १९६८ पासून ते विधान परिषद सदस्य होते. १९९२-९३ या दरम्यान ते विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते होते. तेव्हा त्यांनी राज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पाची पाहणी करून त्यासंदर्भात अहवाल निष्कर्ष पुस्तिकेद्वारे सरकारकडे सादर केला. शिवशाही सरकारात ते जून १९९५ ते मे १९९६ या कालखंडात प्रथम महसूल मंत्री होते. नंतर १९९६ ते १९९९ पर्यंत शिक्षण मंत्री म्हणून कार्यरत होते. मंत्री म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय लोकाभिमुख ठरले आहेत.