मुंबई -शरद पवार यांनी राज्यातील सरकार स्थापनेबाबत केलेले विधान काही चुकीचे नाही. राज्यातील क्रमांक 1 आणि 2 चे पक्ष म्हणून आम्हालाच सत्ता स्थापनेचा विचार करायला पाहिजे, तो विचार आम्ही करत आहोत. शरद पवार यांचा अनुभव मोठा आहे, ते पाहता भाजपवाल्यांना पवारांना समजून घ्यायला 100 जन्म घ्यावे लागतील, असे संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.
हेही वाचा... आठवलेंनी सुचवला नवा फॉर्म्युला; भाजपला मान्य असल्यास शिवसेनाही तयार
राज्याच्या निवडणुकांचे निकाल लागून आता बराच कालावधी उलटला आहे. तरी अद्याप राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नाही. कोणताही पक्ष सरकार स्थापन न करू शकल्याने अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. एकीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सत्तास्थापनेसाठी पुढाकार घेतला असला तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या वक्तव्यांमुळे सत्तास्थापनेचा पेच अद्यापही सुटल्याचे दिसत नाही. रविवारी देखील शरद पवार यांच्या विधानाने संभ्रम निर्माण झाला होता. मात्र अशातच संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन, शिवसेनाच राज्यात सरकार स्थापन करेल आणि स्थिर सरकार देईल असा विश्वास व्यक्त केला आहे.
हेही वाचा... शरद पवार- सोनिया गांधी यांची बैठक संपन्न; काय ठरले याबाबत उत्सुकता