महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

विरोधकांचा कोथळा काढून शिवरायांनी स्वराज्य टिकवले, महाराष्ट्रातही तेच होईल- संजय राऊत

महाराष्ट्राला इतिहास आहे, इतरांना केवळ भूगोल असेल, मात्र शिवरायांचा जन्म या मातीत झाला ही बाब महत्वाची आहे. तसेच ज्या शिवाजींच्या महाराष्ट्रात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब, असल्याचेही राऊत यावेळी म्हणाले.

संजय राऊत
संजय राऊत

By

Published : Feb 19, 2021, 11:42 AM IST

Updated : Feb 19, 2021, 12:19 PM IST

मुंबई - आज छत्रपती शिवाजी महाराजांची ३९१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवरायांच्या राजनितीचा दाखला देत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शेतकरी आंदोलनावरून भाजपवर निशाणा साधला आहे.

शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव हा देशात साजरा होत आहे. शिवाजी महाराजांकडून संपूर्ण देश खरी प्रेरणा घेतोय. आपण त्यांना हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हणतो. निश्चयाचा महामेरू म्हणतो, महाराष्ट्राला इतिहास आहे, इतरांना केवळ भूगोल असेल, मात्र शिवरायांचा जन्म या मातीत झाला ही बाब महत्वाची आहे. तसेच ज्या शिवाजींच्या महाराष्ट्रात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब, असल्याचेही राऊत यावेळी म्हणाले.

महाराष्ट्रातही तेच होईल- संजय राऊत

शेतकऱ्यांच्या देठाला धक्का लागू नये असा न्याय असावा हे शिवाजी महाराजांनी सैन्याला सांगितले होते. मात्र, आज शेतकऱ्यांच्या पोटाला, देठाला, अस्तित्वाला धक्का लागतोय, ही परिस्थिती बिकट आहे, असे राऊत म्हणाले.

शिवरायांनी विरोधकांचा कोथळा काढला-

विरोधकांवर निशाणा साधताना इतिहासाचा दाखला देत राऊत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनाही विरोधक होते. अफजल खान, शाहिस्ते खान होता. पण तरीही शिवाजी महाराज खचले नाहीत. सगळ्यांचा कोथळा काढून शिवाजी महाराजांनी स्वराज्य टिकवले. त्याच प्रमाणे महाराष्ट्रातही होईल, असा टोला लगावला.

शिवजयंती मुंबईत उत्‍साहात साजरी -

सकाळपासून मुंबईच्या विविध ठिकाणी शिवजयंती नियमांचे पालन करून साजरी होताना दिसत आहे. लहानगे भगवा झेंडा घेऊन सायकलवर महाराजांचा जयघोष करताना दिसत आहेत. विविध राजकीय पक्षांकडूनही वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता सोशल मीडियावरही एकामेकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत.

प्रभात फेऱ्या, बाईक रॅली, मिरवणुका न काढता शिवजयंती पारंपरिक उत्साहात साजरी केली जाणार आहे. अनेक ठिकाणी शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिरे, आरोग्यविषयक उपक्रम तसेच स्वच्छता जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. अनेक ठिकाणी पोवाडे, नाटक यांचे ऑनलाईन प्रक्षेपण केले जाणार आहे. शिवजयंतीच्या उत्सवासाठी शंभर जणांना एकत्र उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.

Last Updated : Feb 19, 2021, 12:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details