महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ईडीची नोटीस म्हणजे आमच्यासाठी पदकं, प्रेमपत्रं असल्यासारखं वाटते - संजय राऊत - ईडीच्या नोटीसला आम्ही घाबरत नाही

नोटीस पाठवण्यास संदर्भात टायमिंग पाहिलं तर नोटीस मिळण्याआधी भाजपचे अनेक नेते अनिल परब यांचे सातत्याने नाव घेत होते. ईडीने त्यांचा एक डेस्क ऑफिसर भाजपच्या कार्यालयात ठेवला आहे किंवा भारतीय जनता पक्षातील कोणीतरी अधिकारी यांच्या कार्यालयात ऑफिसर म्हणून बसला असेल. आम्हाला नाही माहित पण यांना कसे कळाले की अनिल परब यांना नोटीस येणार आणि त्यांना त्या दिवशी चौकशीला बोलावलं जाणार? असा सवाल राऊत यांनी केला.

संजय राऊत
संजय राऊत

By

Published : Aug 30, 2021, 12:47 PM IST

Updated : Aug 30, 2021, 1:41 PM IST

मुंबई- शिवसेना नेते आणि परिवहन मंक्षी अनिल परब यांना मनी लॉड्रीग प्रकरणी ईडीने नोटीस बजावली आहे. मात्र त्याला परिवहन मंत्री अनिल परब उत्तर देतीलच. पण आता ईडीची नोटीस म्हणजे आमच्यासाठी पदक असल्यासारख वाटत आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. ईडीच्या कार्यालयात भाजपने पदाधिकारी बसवला आहे का? त्यांना कस माहिती होते कोणाला ईडीची नोटीस जाणार? असा सवाल संजय राऊत यांनी यावेळी केला आहे. राजकारणात काम करणाऱ्यांना अशा प्रकारचे प्रेम पत्र येत असतात. आमच्या घरी देखील अशी नोटिस देण्यात आली होती. शिवसेना अशा नोटीसने कमजोर होणार नाही. तुम्ही आमची चिंता करू नका, अशी टोला संजय राऊत यांनी भाजपाच्या नेत्यांना लगावला आहे.

ती आमच्यासाठी प्रेमपत्र आहेत-

सरकार मधले अनिल परब हे महत्वाचे मंत्री आहेत. त्याहीपेक्षा ते शिवसेनेचे महत्वाचे नेते आणि शिवसैनिक आहेत. नोटीस पाठवण्यास संदर्भात टायमिंग पाहिलं तर नोटीस मिळण्याआधी भाजपचे अनेक नेते अनिल परब यांचे सातत्याने नाव घेत होते. ईडीने त्यांचा एक डेस्क ऑफिसर भाजपच्या कार्यालयात ठेवला आहे किंवा भारतीय जनता पक्षातील कोणीतरी अधिकारी यांच्या कार्यालयात ऑफिसर म्हणून बसला असेल. आम्हाला नाही माहित पण यांना कसे कळाले की अनिल परब यांना नोटीस येणार आणि त्यांना त्या दिवशी चौकशीला बोलावलं जाणार? असा सवाल करत राऊत यांनी किरीट सोमय्या, चंद्रकांत दादा पाटील यांना याबाबत माहीत आहे हे काय चाललं आहे, असा टोला लगावला आहे.


येऊ देना नोटीस...ती आमच्यासाठी प्रेमपत्र आहेत-

राजकारणामध्ये अशी प्रेमपत्र काम करणार्‍या माणसांना येत असतात. आम्ही त्यांना उत्तर देऊ आणि कायदेशीर कारवाईला पूर्णपणे सामोरं जाऊ यंत्रणेला सहकार्य करणार आहोत. अनिल परब हे त्यांच्या नोटीसला उत्तर देतील, ते समर्थ आहेत. अशा नोटीस आमच्या घरी देखील बऱ्याच आल्या आहेत. त्यात विषय देत नाहीत आणि चौकशीला या असे सांगतात, असा टोला देखील राऊत यांनी चौकशी करण्यासाठी नोटीस पाठवणाऱ्या संस्थांना लगावला. असल्या नोटीसने शिवसेना सरकार कमजोर होईल, वाकेल, सरकारला तडे जातील आणि टपून बसलेले डोमकावळे आहेत, त्यांचा काही फायदा होईल. मात्र असं काही होणार नाही, असे अनेक घाव आम्ही पचवले आहेत. तुम्ही आमची चिंता अजिबात करू नका अनिल परब यांची ही चिंता करू नका, असा खोचक सल्ला देखील राऊत यांनी विरोधकांना यावेळी दिला.

केंद्रीय मंत्र्यांवर कारवाई झालेली कायदेशीर कारवाई होती ती देशात कोणावरही होऊ शकते. जबाबदार व्यक्ती कायद्याचं पालन न करता ठामपणे बेजबाबदारपणे वागत असे त्याच्यावर कारवाई होऊ शकते. महाराष्ट्राचे एखाद्या मंत्र्याने अशी भाषा वापरली तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते माझ्यावर ही कारवाई होऊ शकते. जबावदार पदावरील व्यक्ती आणि त्यांचं कुटुंब असते अशा लोकांनी जास्त जबाबदारीने वागायचे असते. मुख्यमंत्र्यांच्या जवळचे खूप लोक आहेत. मुख्यमंत्र्यांच्या जवळ एक नेता नसतो अनेक नेते आहेत अनिल देशमुख देखील मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत, पवार साहेबांच्या जवळचे आहेत. नोटीस आम्हालाही आली होती इशाऱ्या इशाऱ्यांची आम्ही पर्वा करत नाही. मात्र तुमच्या हातात चौकशीची शस्त्रे आहेत ती कमी वापरा असा टोला देखील राऊत यांनी भाजपाला लगावला आहे.

शेतकऱ्यांच्या रक्ताची किंमत सरकारला मोजावी लागेल

हरियाणामध्ये शेतकऱ्यांवर झालेला हल्ला लाजिरवाणी आहे. शेतकऱ्यांची रक्ताची किंमत द्यावी लागेल. शेतकऱ्यांच्या मनाची गोष्ट आपण ऐकत नाहीत. मंदिर उघडण्यासाठी भाजप जे बोलतंय ते त्यांनी केंद्राने दिलेल्या मार्गदर्शक तत्वे दिली आहेत, ते भाजप नेत्यांनी पाहावे. बाकीच्या राज्यात पण मंदिर सुरू आहेत का बघावे, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

Last Updated : Aug 30, 2021, 1:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details