महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

संजय राऊत यांना मास्टर दीनानाथ पुरस्कार जाहीर - शिवसेना नेते संजय राऊत यांना पुरस्कार

संजय राऊत हे शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक आहेत. शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांपैकी राऊत एक आहेत शिवसेनेचे राज्यसभा खासदार तसंच दिल्लीत पक्षाची भूमिका मांडणारा एक चेहरा म्हणूनही त्यांची ओळख आहे.

संजय राऊत यांना मास्टर दीनानाथ पुरस्कार जाहीर
संजय राऊत यांना मास्टर दीनानाथ पुरस्कार जाहीर

By

Published : Apr 25, 2021, 1:45 PM IST

मुंबई - दीनानाथ स्मृति प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृति पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्यांच्या 79 व्या स्मृतिदिनी हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये पत्रकारितेतील योगदानासाठी सामनाचे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत यांनाही पुरस्कासाने सन्मानित करण्यात येणार आहे.

मागील काही वर्षांपासून मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृति प्रतिष्ठानच्या वतीने हा मानाचा पुरस्कार दिला जातो. प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी संगीत, समाजसेवा, रंगभूमी, साहित्य, चित्रपट, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांत अतुलनीय कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते.

यंदाच्या वर्षी वैद्यकीय क्षेत्रासाठी डॉ. प्रतित समधानी, डॉ. अश्विन मेहता, डॉ. राजीव शर्मा, डॉ. जनार्दन निंबाळकर, डॉ. निशित शहा तर अभिनयासाठी ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर, प्रेम चोपडा, नाना पाटेकर यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. कोरोना काळामुळे सध्या कोणताही समारंभ होणार नसून हे पुरस्कार या विजेत्यांना नंतर देण्यात येणार आहे.

संजय राऊत यांच्याबद्दल थोडक्यात

संजय राऊत हे शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक आहेत. शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांपैकी राऊत एक आहेत शिवसेनेचे राज्यसभा खासदार तसंच दिल्लीत पक्षाची भूमिका मांडणारा एक चेहरा म्हणूनही त्यांची ओळख आहे.

राऊत यांच्या करिअरची सुरुवात राजकारणातून नाही तर पत्रकारितेतून झाली होती. लोकप्रभा साप्ताहिक ते सामनाचे कार्यकारी संपादक, असा त्यांचा पत्रकारितेतला प्रवास आहे. संजय राऊत एक उत्तम पत्रकार आहेत. क्राईम रिपोर्टर ते संपादक असा प्रवास खूप कमी लोकांनी केला आहे. राजकीय पत्रकार ते संपादक असा प्रवास केलेले अनेक संपादक आहेत. पण क्राईम रिपोर्टींगपासून सुरूवात करणारे खूप कमी पत्रकार संपादक झालेले आहेत. सध्या ते कुठेही असले तरी तिथून ते अग्रलेख पाठवत असतात.

ABOUT THE AUTHOR

...view details