मुंबई -शिवसेनेचा आज 56 वा वर्धापनदिन. त्यानिमित्ताने पवईच्या वेस्ट इन हॉटेलमध्ये शिवसेनेच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर हल्ला चढवला आहे. सध्या राजकारणात काही लोकांना घमेंड आली आहे. राज्यसभेची एक जागा जिंकली म्हणजे आपण महाराष्ट्र आणि जग जिंकले असे त्यांना वाटत आहे. आमच्या राजकीय विरोधकांना मी इतकंच सांगू इच्छितो की, 'तेरा घमंड चार दिन का है पगले, हमारी बादशाही तो खानदानी है', अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला ( sanjay raut criticized bjp ) आहे.
Sanjay Raut : 'तेरा घमंड चार दिन का है पगले, हमारी बादशाही तो खानदानी है'; राऊतांचा भाजपावर निशाणा - संजय राऊतांची भाजपावर टीका
आमच्या राजकीय विरोधकांना मी इतकंच सांगू इच्छितो की, 'तेरा घमंड चार दिन का है पगले, हमारी बादशाही तो खानदानी है', अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला ( sanjay raut criticized bjp ) आहे.
Sanjay Raut
संजय राऊत म्हणाले की, अलिकडे राज्यसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत एकादी जागा इकडे-तिकडे झाली असले. मात्र, राज्यसभेची एक जागा जिंकली म्हणजे आपण महाराष्ट्र जिंकला अथवा जग जिंकले आहे, या थाटात वावरु नका. तुमची राजकीय घमेंड ही चार दिवसांची असेल, मात्र शिवसेनेची 'बादशाही' खानदानी आहे. या महाराष्ट्राची सूत्रे ही शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे राहतील, असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.