महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sanjay Raut Allegation : INS विक्रांत नंतर सोमय्यांची आता 'टॉयलेट एक लव्ह स्टोरी' - Kirit Somaiya corruption in INS Virkrant

आयएनएस विक्रांत ही युद्धनौका वाचवण्यासाठी लोकांकडून जमा करण्यात आलेल्या 58 कोटी रुपयांच्या निधीत घोटाळा केल्याचा ( Kirit Somaiya corruption in INS Virkrant ) आरोप केला होता. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून सोमय्या चौकशीच्या ( Kirit Somaiya case in court ) फेऱ्यात अडकले आहेत. आता सोमय्यांना अडकवण्यासाठी त्यांचा आणखी एक घोटाळा बाहेर काढणार असल्याच त्यांनी आज आपल्या घरी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

खासदार संजय राऊत
खासदार संजय राऊत

By

Published : Apr 15, 2022, 1:28 PM IST

Updated : Apr 15, 2022, 5:08 PM IST

मुंबई - शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर आयएनएस विक्रांत ही युद्धनौका वाचवण्यासाठी लोकांकडून जमा करण्यात आलेल्या 58 कोटी रुपयांच्या निधीत घोटाळा केल्याचा आरोप केला होता. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून सोमय्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. आता संजय राऊत सोमय्यांना अडकवण्यासाठी त्यांचा आणखी एक घोटाळा बाहेर काढणार असल्याच त्यांनी आज आपल्या घरी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

टॉयलेट घोटाळा -राऊत म्हणाले की, "सोमय्या जामिनावर बाहेर आहे आणि तो आमच्यावर आरोप करतोय. पोलिस चौकशीला आले की लपून बसतो. मी आता या सोमय्या कुटुंबियांचा आणखी एक घोटाळा लवकरच सर्वांसमोर आणणार आहे. यांनी काही कोटींचा टॉयलेट घोटाळा केला. म्हणजे पैसा कसा खायचा ? खोटी बिले कशी सादर करायची ? ते बघा. यांचे यांच्या मेसेजच्या नावाने सौ. सोमय्या यांची युवा प्रतिष्ठान ही संस्था हे सर्व कांड करते ते लवकरच समोर येईल." तसेच टॉयलेट एक लव्ह स्टोरी म्हणत ट्विट केले आहे.

देशभक्त फडणवीस शांत का ? -"आपल्या पक्षातील नेत्यांच्या भ्रष्टाचारावर देश प्रेमाचा मोठा पुळका असलेले देवेंद्र फडणवीस या सगळ्या प्रकरणांवर सांगत असतात. ते कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीत. त्यांनी शरद पवारांवर 14 ट्विट करत आरोप केला. हे सर्व आरोप आहेत पण आम्ही पुराव्यानिशी सर्व सादर करत असताना त्यावर मात्र फडणवीस काही बोलत नाहीत ही गंभीर बाब आहे." असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टीला छिद्र -पुढे बोलताना राऊत म्हणाले की, "सध्या न्याय देवतेचे निकाल जरी बघितले तरी तुमच्या लक्षात येईल आपली न्यायव्यवस्था कुठल्या दिशेने चाललेय. न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी आहे पण त्या पट्टीचा आता कुठेतरी एक चित्र पडलेय आणि त्या छिद्रातून एकाच बाजूचे एका विचारसरणीचे लोक या न्याय देवतेला दिसतात. सत्र न्यायालयाने सरळ सरळ ठपका ठेवलेला असताना उच्च न्यायालय मात्र संरक्षण देते. त्यामुळे आता न्यायव्यवस्थेवरुन देखील सामान्य नागरिकांचा विश्वास उडत चालला आहे."

Last Updated : Apr 15, 2022, 5:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details