मुंबई - शिवसेनेचे 17 आमदार हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन नाराज आहेत आणि ते मनोहर जोशी यांच्यासोबत नाराजी व्यक्त करण्यासाठी मातोश्रीवर गेले, असे वृत्त सकाळपासून सुरू होते. त्यावर 'मी शिवसेनेच्या कोणत्याही आमदारांना घेऊन मातोश्रीवर गेलो नाही', असे खुद्द मनोहर जोशी यांनी स्पष्ट केल्याने तुर्तास तरी या चर्चेला पूर्णविराम लागला आहे.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन आमदारांसोबत मातोश्रीवर गेलो नाही; मनोहर जोशींचं स्पष्टीकरण - मनोहर जोशी
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मी शिवसेनेच्या कोणत्याही आमदाराला मोतीश्रीवर घेवून गेलो नाही, असे शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन आमदार नाराज असल्याच्या चर्चेला सध्या तरी पुर्णविराम मिळाला आहे.
मनोहर जोशी
शिवसेनेत पक्षशिस्त असल्यामुळे पक्ष प्रमुखांचा आदेश हाच आमच्यासाठी महत्वाचा असतो. त्यामुळे शिवसेनेत कुणी नाराज असल्याचे आपल्याला माहीत नसल्याचेही मनोहर जोशी म्हणाले.