मुंबई- नारायण राणे यांची गणिते नेहमीच चुकत असतात. ते जिथे जिथे जातात तिथे तिथे सत्ता जाते, असा टोला शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी राणेंना लगावला. नारायण राणे यांनी 'मनी' व 'मसल' पॉवरमुळे सिंधुदुर्गमध्ये दहशत पसरवली होती. या दहशतीच्या विरोधातच माझा लढा होता, असे केसरकर म्हणाले.
'नारायण राणे जिथे जिथे जातात तिथे तिथे सत्ता जाते' - नारायण राणे
नारायण राणे यांची गणिते नेहमीच चुकत असतात. ते जिथे जिथे जातात तिथे तिथे सत्ता जाते, असा टोला शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी राणेंना लगावला.
शिवसेना नेते दीपक केसरकर
हेही वाचा -अजित पवारांच्या पाठिंब्याबद्दल वेळ आल्यावर बोलेन - देवेंद्र फडणवीस
गेल्या पाच वर्षांमध्ये सिंधुदुर्गसारख्या संवेदनशील जिल्ह्यात कुठलीही दंगल झाली नसल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले. याबरोबरच मुख्यमंत्रिपदावर उद्धव ठाकरे हे आल्यावर सर्वात अगोदर राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.