ED second summon to Sanjay Raut : संजय राऊत यांना ईडीची पुन्हा नोटीस, एक जुलैला चौकशीसाठी बोलावले - ED Summoned Raut For Questioning
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांना अंमलबजावणी संचालनालयाने ( Directorate Of Enforcement) दुसऱ्यांदा नोटीस बजावली आहे. मुंबईतील पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने ( ED ) दुसऱ्या वेळेस नोटीस बजावत 1 जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना केली आहे.
मुंबई -संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांना दोन दिवसांपूर्वीच ईडीने ( ED ) पहिली नोटीस बजावली होती. पहिल्या नोटीसनुसार संजय राऊत यांना आजच ईडी कार्यालयात हजर व्हायचे होते, परंतु संजय राऊत यांच्या वकिलांनी यासंदर्भात हजर होण्यासाठी संजय राऊत यांना वेळ वाढवून देण्याची विनंती केली होती. आता त्यांना 1 जुलै रोजी बोलावण्यात आले आहे. मुंबईतील पत्राचाळ जमीन घोटाळ्यात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप राऊत यांच्यावर आहे. त्याबाबत 1 जुलै रोजी त्यांची चौकशी होऊ शकते.